वाडा : तालुक्यातील मांगाठणे येथील बबन पाटील यांच्या घराचे छप्पर ३ सप्टेंबर रोजी वादळ वाऱ्यामुळे उडाले होते. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू ,कपडे व फर्निचर भिजून मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन बेघर होण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.प्रशासनाने पंचनामा करूनही एवढ्या दिवसानंतर नुकसानभरपाई मिळालेली नाही. त्यामुळे तहसीलदारांना तक्रार देऊन नुकसान भरपाई द्या अन्यथा आपल्या कार्यालयात संसार थाटण्याची परवानगी द्या असा इशारा शेतकºयाने तहसीलदारांना दिलेल्या तक्र ारीत दिला आहे. वारंवार तहसीलदार कार्यालयात हेलपाटे मारूनही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप पाटील यांनी तक्रारीत केला आहे. येत्या आठ दिवसात नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
शेतकरी थाटणार तहसील कार्यालयात संसार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 12:45 AM