शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

कारवाई करताना वसई मनपाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 1:05 AM

कंपनी मालकासह कर्मचाऱ्यांची गुंडगिरी : आरोपींविरोधात गुन्हा 

नालासोपारा : वसई फाटा येथील एका कंपनीचे रस्त्यावरील अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यासाठी गेलेल्या महानगरपालिकेच्या ‘जी’ प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांसह कर्मचाऱ्यांवर दगड, लाठ्याकाठ्या घेऊन जीवघेणा हल्ला करीत कंपनी मालकासह कर्मचाऱ्यांनी गुंडागर्दी केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी घडली. कंपनीच्या गुंडांनी जेसीबी चालकाचे डोके फोडून जेसीबीचीही नासधूस केली आहे. या प्रकरणी सहायक आयुक्तांनी वालीव पोलीस ठाण्यात तक्रार देऊन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

वसई-विरार शहर महापालिकेच्या प्रभाग समिती ‘जी’ अंतर्गत येणाऱ्या सर्व्हे नंबर ६२ च्या प्लॉट नंबर ३ व प्लॉट नंबर ४ समोरील रस्त्यावर अतिक्रमण केलेले बांधकाम निष्कासित करण्यासाठी साहाय्यक आयुक्त राजेंद्र कदम, अतिक्रमण विभागाचे इंजिनीअर कौस्तुभ तामोरे, मनपाचे कर्मचारी जितेंद्र जाधव, सुशांत किणी, विद्याधर पाटील, तुषार पाटील, हरिहर पाटील, हितेश भोईर, रोहित भोईर, अलंकार रिजाई, जागृत किणी, केतन पाटील व यांच्यासोबत एक जेसीबी आणि त्याचा चालक रमजान अली अब्दुल खान हे सर्व बुधवारी दुपारी ३ वाजता इन्टरटेक टेक्नॉलॉजीस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या गेटसमोर पोहोचले.

आरोपी अरुण कमलाप्रसाद मिश्रा, नीरज शेषणाथ पासवान, पुष्पराज राजेश्वरी सिंग, सागर सुनील चव्हाण, सुबोध इंद्रसेन नागेन व त्यांच्या पाच ते सात साथीदारांनी हातात लाकडी दांडके, लोखंडी रॉड घेऊन कामात अटकाव करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. दरम्यान, साहाय्यक आयुक्तांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की करून जेसीबीचालक रमजान अली अब्दुल खान याच्या डोक्यात दगड मारून त्याला गंभीर जखमी केले. आरोपींनी जेसीबीवर लाठ्याकाठ्या व लोखंडी रॉडने काचा फोडून तिचे मोठे नुकसान केले. 

वरिष्ष्ठांच्या आदेशानुसार अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी मनपा कर्मचाऱ्यांसह गेलो होतो. कंपनीच्या मालकासह कर्मचाऱ्यांनी गुंडागर्दी करून जेसीबी चालकाचे डोके फोडले आहे. - राजेंद्र कदम, साहाय्यक आयुक्त, जी प्रभाग, वसई

या प्रकरणी ८ आरोपींना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केल्यावर दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आली आहे.- विलास चौगुले, वपोनि, वालीव पोलीस ठाणे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार