वाडा, : भिवंडी - वाडा या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून या खड्ड्यांची दुरूस्ती करण्यास बांधकाम विभाग चालढकल करीत आहे. कुडूस नाक्यावरील हातगाडयÞा व टपऱ्यांचे अतिक्रमण हटविण्यास जाणीवपूर्वक चालढकल करीत असल्याच्या निषेधार्थ श्रमजीवी संघटनेने सोमवारी दुपारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता अरविंद कापडनिस यांना बेशर्मीची पाने व फुलांचा हार देऊन औपरोधिक सत्कार करून निकृष्ट कामाचा जाब विचारला. या महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून यामुळे वाहतूककोंडी व अपघात होत आहेत. त्यात अनेक जण जायबंदी होत असताना बांधकाम प्रशासन याकडे मात्र दुर्लक्ष करीत आहेत. तसेच कुडूस नाक्यावर हातगाडयÞा व टपऱ्यांची अतिक्र मणे हटविण्याबाबत श्रमजीवी संघटनेने वारंवार तक्र ारी केल्या होत्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने संतापलेल्या श्रमजीवी संघटनेच्या कार्यकत्यानी सोमवारी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात अरविंद कापडनिस यांची भेट घेऊन याचा जाब विचारला. त्यानंतर कापडनिस यांना समर्पक उत्तर न देता आल्याने बेशर्मीच्या फुलांचा हार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या आंदोलनात श्रमजीवी संघटनेचे वाडा तालुकाध्यक्ष मिलींद थुले, तालुका संघटक सरिता जाधव, बाळाराम पाडोसा, कल्पेश जाधव, दिलीप चौधरी यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. खड्ड्यांची दुरूस्ती व हातगाडयÞांचे अतिक्रमण येत्या दोन दिवसांत करण्यात येईल असे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. (वार्ताहर)
बेशर्मीच्या फुलांचा हार देऊन सत्कार
By admin | Published: June 01, 2016 2:17 AM