- राहुल वाडेकर ।
विक्रमगड : डोंगर माथ्यावर विविध प्रकारच्या रानभाज्या उगवतात तसेच अनेक औषधी झाडांना याकालामध्ये पालवी फुटते, फुले येतात ती फुले,पाने व भाज्या आदिवासी पावसाळ्यात मोठ्या आवडीने खातात. या भाज्यांना ग्रामीण तसेच शहरी भागात व बाजारपेठेमध्ये चांगली मागणी आहे. आदिवासी बांधव भिवंडी, कल्याण, वसई, विरार, पालघर अशा शहरी भागातील बाजारपेठेत या भाज्या घेऊन दाखल होतात प्रदूषणमुक्त अस्सल नैसर्गिक वातावरण तयार झालेल्या व शरीरासाठी उपयुक्त असणाºया डोंगर कपारीतून आणलेल्या रानभाज्यांचे प्रदर्शन नवरंग मित्र मंडळाच्या व्यासपीठावर ग्रामविकास समिती, श्रीराम मित्र मंडळ, महिला बचत गट कुºहे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत करण्यात आले होते. यावेली तहसिलदार सुरेश सोनवणे, मंडळ अधिकारी शशी पडवळे सर्व तलाठी सजा मंडळाचे अध्यक्ष निशिकांत संख आदिंची उपस्थिती होतीया महोत्सवात आपल्याला माहीतही नाहीत अशा खरशेंगा, करडू, नाळभाजी, कोहरेल पाला, बाफलीचा पाला, आघाडा, आकर घोडा यासहित विविध औषधी गुणधर्म असणाºया शंभरहून अधिक रानभाज्याचा समावेश होता. या भाज्या, त्याची चव, त्या कशा बनवाव्यात यांची माहिती घेण्यासाठी शहरातील महिलांनी गर्र्दी केली होती विविध ठिकाणच्या खवैय्यांनी या प्रदर्शनास आवर्जून भेट देऊन या भाज्याचे महत्व जाणून घेतले. या आयोजनामागील भूमिका माजी सरपंच जगन्नाथ हिलीम याÞंनी स्पष्ट केली.तसेच गुरूवारी अष्टमीनिमित्त झालेल्या होमहवनाच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा चार हजार भाविकांनी लाभ घेतला अशी माहिती मंडळाचे व्यवस्थापक महेश आळशी यांनी दिली.