पालघर : जिल्ह्याचे टुरिझम मॉडेल म्हणून ओळखल्या जाणा- या केळवे बीच पर्यटनाचा प्रसार व प्रचार व्हावा या हेतूने केळवे बीच पर्यटन विकास संघाने १३ व १४ जानेवारी रोजी केळवे पर्यटन महोत्सवाचे आयोजन केले असून या महोत्सवात येथील महिला बचतगटाचे पारंपरिक खाद्य पदार्थ, सांस्कृतिक कार्यक्र माचे, लोक कलेचे दर्शन, व खेळाचे आयोजन करण्यात आले आहे,मुंबई पासून केवळ शंभर किमी अंतरावर असलेल्या केळवे बीच पर्यटन येथील स्वछ, व अथांग सुंदर समुद्र, किनार्या वरील हजारो सुरु च्या झाडांची बाग, पानवेलीचे मळे, नारळी,पोफळी, केळी, चिकू, आंबा आदींच्या बागा तसेच पुरातन मंदिरे, व ऐतिहासिक किल्ले आदीमुळे पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे.गेल्या काही वर्षात केळव्यात पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असली तरी मुंबई, नाशिक, पुणे, नवी मुंबई, ठाणे, परिसर तसेच महाराष्ट्रद्बत आणि देशात अनेक ठिकाणी या पर्यटन स्थळाचा प्रसार, व प्रचार न झाल्यामुळे निसर्गाने विविधतेने नटलेल्या व समुद्र, सह्याद्री, पर्वताच्या कुशीत वसलेल्या या पर्यटन स्थळाकडे अनेक पर्यटन प्रेमी आत्ता पर्यत येऊ शकले नाहीत व म्हणूनच प्रयत्न महोत्सवाच्या माध्यमातून प्रसार व प्रचार करण्याचे येथील पर्यटन व्यवसायिकाच्या संघटनेने ठरविले आहे,जानेवारीच्या १३ व १४ तारखेला होणाºया या केळवे बीच महोत्सवात येथील महिला बचत गटातर्फे विविध पारंपरिक खाद्य पदार्थद्बची रेल चेल असून येथील प्रसिद्ध शाकाहारी, व मांसाहारी, उकडहंडी, मुठे, पोतेंडी, भाकºया, विविध प्रकारचे समुद्रातील व खाडीतील मासे, विविध प्रकारच्या बनविले जाणारे चिकन, तसेच मटणाचे वेगवेगळे प्रकार, अळूवडी, पुरणपोळी, कोथिंबीर वड्या, विविध प्रकारची कटलेट, कोलंबी पुलाव, फिश पुलाव, विविध प्रकारच्या बिर्याणी, कबाब, भुजिंग, याच बरोबर अस्सल शाकाहारी पारंपरिक पदार्थाचा आस्वाद खावयांना चाकता येणार आहे.भरगच्च कार्यक्रमादरम्यान पाककला, संस्कृती अन् विशेषांकाचे प्रकाशन- १३ जानेवारी सकाळी ११ वाजे पासून सुरू होणारा हा महोत्सव रात्री १० पर्यत सुरू राहणार आहे. ११ वाजता उदघाटन व विशेषांकाचे प्रकाशन व दुपारी सांस्कृतिक कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले आहे.- १४ जानेवारी रोजी सकाळी महिलांचे हळदी कुंकू, व सांस्कृतिक कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले असून त्याच दिवशी रात्री, १० वाजता या महोत्सवाची सांगता होणार आहे. या निमित्ताने पर्यटकांना पारंपारिक पदार्थ चाखता येणार आहेत.- या महोत्सवाचे उदघाटन पालघरचे खासदार चिंतामण वनगा याचे हस्ते होणार असून कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी राज्याचे आदिवासी विकास व जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सावरा भूषविणार आहेत. या सह इतर मान्यवरही येणार आहेत.
बीच पर्यटनाच्या प्रसारासाठी केळव्यात महोत्सव; पाककला, संस्कृती अन् विशेषांकाचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2018 1:54 AM