शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील सर्व रिक्त पदे भरू

By admin | Published: August 06, 2015 11:26 PM

पालघर जिल्ह्णातील आदिवासींचा विकास घडवितांना प्रशासनाला अनेक अडचणी, समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे मान्य करून येत्या सप्टेंबर

पालघर : पालघर जिल्ह्णातील आदिवासींचा विकास घडवितांना प्रशासनाला अनेक अडचणी, समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे मान्य करून येत्या सप्टेंबर पर्यंत सर्व कार्यालयातील रिक्तपदे भरली जातील, असे आश्वासन आदिवासी विकास व पालकमंत्री विष्णू सवरा यांनी पालघर जिल्ह्णाच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्ताने जनतेला दिले.महसूल दिनाचे औचित्य साधून गुरुवारी पालघर जिल्हा प्रशासकीय विस्तारीत इमारतीचे उद्घाटन आज पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते पार पडले. पालघर जिल्हा सागरी, नागरी, डोंगरी अशा भागात विभागला गेला असताना जिल्ह्णाला १२० कि. मी. चा प्रशस्त व सुंदर समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे केळवा, शिरगाव, डहाणू, बोर्डी इ. गावातील पर्यटनाचा विचार करतांना जव्हार, सारख्या थंड हवेच्या पर्यटनस्थळाच्या विकासासाठी विकास आराखडा तयार करण्यात आल्याचे पालकमंत्री सवरा यांनी सांगितले. पालघर जिल्ह्णात भिषण पाणीटंचाईची समस्या अनेक वर्षापासून भेडसावत असल्याने जलयुक्त शिवार योजनेंतर्गत दोन हजार शेततळी व पाचशे वनतळी बांधण्याचा संकल्प राज्यशासनाने केल्याचेही त्यांनी सांगितले. यामुळे आदिवासी बांधवाना त्यांच्या गावातच रोजगार निर्माण झाल्यास स्थलांतरासारखा महत्वाचा प्रश्न निकाली निघेल असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केली.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर, अडचणीवर मात करून तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणाांनी पालघर जिल्ह्णाची घोषणा केली. त्यानंतर जिल्हाधिकारी म्हणून जिल्ह्णाचा डोलारा यशस्वीपणे सांभाळण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी अभिजीत बांगरांनी आपल्या टीमसह चालविलेले काम अत्यंत कौतुकास्पद असल्याचे मत माजी राज्यमंत्री राजेंद्र गावितांनी व्यक्त केले तर आदिवासींचा सर्वकष विकास डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्णाची निर्मिती करण्यात आल्यानंतर अनेक विभागातील रिक्तपदामुळे ठाणे जिल्ह्णाचा कारभार बरा होता असे नागरीक उघडपणे बोलू लागले आहेत. त्यामुळे पालकमंत्री सवरा यांनी याबाबत खंबीर भूमिका घ्यावी त्यासाठी आमचा पूर्ण पाठींबा राहील असे आमदार विलास तरे यांनी सांगितले.कार्यक्रमात महसूल विभागातील कोतवालापासून ते उपजिल्हाधिकारी पर्यंतच्या अधिकाऱ्यांनी विशेष कार्य केलेल्या अप्पर जिल्हाधिकारी किशोर तावडे, प्रांताधिकारी शिवाजीराव दावभट,नायब तहसिलदार सचीन चौधरी, शिपाई दिनेश कोल्हेकर व कृष्णकांत गडग यांचा सत्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला.यावेळी माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित, आ. विलास तरे, आ. शांताराम मोरे, जि. प. अध्यक्षा सुरेखा थेतले, जिल्हाधिकारी अभिजीत बांगर, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप शिंदे, पोलीस अधीक्षिका, शारदा राऊत, सभापती अशोक वडे, विनीता कोरे इ. मान्यवर उपस्थित होते. मात्र या सोहळ्याबाबत जनतेत फारसा उत्साह दिसून येत नव्हता. त्या पावसाच्या सावटाची भर होती.