आशिष राणे वसई
लोकमत न्यूज नेटवर्क
वसई :- मागील आठवड्यात बऱ्यापैकी लसीकरण झाले नाही किंबहुना शासनाकडूनच पुरवठा होत नसल्याने अत्यंत कमी पुरवठा होऊन वसई विरार महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे लसीकरण मोहीम राबवत असून मागील तीन दिवसांच्या विश्रांती नंतर वसई विरार महापालिका आरोग्य विभागाला आता मंगळवार दि 20 जुलै साठी लाभार्थ्यांच्या दुसऱ्या डोससाठी एकूण 2600 लसीचे डोस प्राप्त झाले असल्याचे जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील यांनी लोकमत ला सांगितले
दरम्यान महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या या लसी मध्ये सर्व लसी या 18 वर्षे पुढे व परदेशी नागरीक यांच्यासाठी दिल्या जाणार आहेत यात 2500 कोव्हीशिल्ड व 100 कोव्हेक्सीन डोस उपलब्ध झाले आहेत
अधिक माहिती नुसार,शासनाने दिलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार वसई विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात covid-19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे दि.19 जुलै रोजी शासनाकडून महानगरपालिकेला 2 हजार 500 कोव्हीशिल्ड व 500 कोव्हेक्सीन लसी प्राप्त झाल्या आहेत
त्यानुसार दि. 20 जुलै 2021 रोजी महानगरपालिका कार्यक्षेत्रातील तक्त्यात नमूद म्हणून नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात अंतर्गत 18 वर्षावरील लाभार्थ्यांचे 50 टक्के ऑनलाइन व 50 टक्के ऑनसाईड नोंदणी द्वारे वसई विरार महानगरपालिका हद्दीतील एकूण 15 लसीकरण केंद्रावर हे covid-19 प्रतिबंधक लसीचे नियोजन करण्यात आले आहे
खालील प्रमाणे केवळ 18 वर्षे वरील व परदेशी नागरीक यांच्या दुसऱ्या डोसचे वाटप केले जाणार आहे
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कोव्हीशिल्ड
बोळिंज 100
निदान 100
रानाळे तलाव 100
नारंगी 100
चंदनसार 100
पाटणकर पार्क 100
उमराळे 100
धानीव 100
मोरेगाव 100
झालवड 100
नवघर 100
दिवाणमान 100
जुचंद्र 100
तुलिंज 400
सर डी एम पेटिट 400
अगरवाल सिविसी 300
अशा एकूण 15 सेंटर वर 2 हजार 400 लसी टोचल्या जाणार आहेत
वसई पूर्व येथे परदेशी नागरिकांना देण्यात येणार 200 लसीचे डोस
वालीव अगरवाल सीव्हीसी मध्ये केवळ परदेशी नागरिकांना दुसरा डोस म्हणून लसीकरण केल जाणार आहे यात कोव्हीशिल्ड 100 व को व्हेक्सीन 100 अशी एकूण 200 डोस दिले जाणार आहेत