- लोकमत न्यूज नेटवर्कविक्रमगड : येथील ग्रामीण रुणालयाला गेले २० दिवस तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने रुग्णसेवेवर मोठा परिणाम झाला होता याबाबत लोकमतने शुक्रवारी ही बातमी प्रसिद्ध करताच शनिवारी तातडीने डॉ खांडवी (एमबीबीएस) यांच्याकडे वैद्यकीय अधिकारीपदाचा कार्यभार दिला असून येत्या सोमवार पयंत डॉ सुनील भडांगे हे. देखील रुजू होणार असल्याची माहिती, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजेंद्र केळकर यान्ांी दिली आहे. या ग्रामिण रूग्णालयात अनागोंदी कारभार चालू असून गेल्या तीन सप्ताहापासून रुग्णावर इंटर्नीच उपचार करीत होते ते गंभीर रूग्णाच्या जीवावर बेतणारे होते इंटर्नी डॉक्टरांना त्यांचे काम सोडून रात्रपाळीची ओपीडी देवू नये अशीही रुग्णांची मागणी आहे. मला सध्या विक्रमगड ग्रामीण रूग्णालयाचा चार्ज दिला असून मी आज कामावर हजर झालो आहे व दोन दिवसात डॉ. भडांगे रूजू होतील.-डॉ.मिलिंद खांडवी
अखेर विक्रमगडला डॉक्टर मिळाला
By admin | Published: July 16, 2017 2:15 AM