शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

अखेर ‘त्या’ खलाशांची गुजरातमधून होणार सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 6:21 AM

लोकमत इफेक्ट : जिल्हाधिकाऱ्यांचे मदत व पुनर्वसन सचिवांना पत्र

हितेन नाईक ।लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : जिल्ह्यातील पोरबंदर, वेरावल येथे मच्छीमारीनिमित्त गेलेल्या हजारो खलाशी कामगारांना मरणयातना भोगाव्या लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी घेतली असून त्यांना पुन्हा घरी आणण्याबाबत राज्याच्या मदत व पुनर्वसन सचिवांना पत्र पाठविले आहे.गुजरात राज्यातून पोरबंदर, वेरावल येथील बंदरांत मासेमारी करणाºया ट्रॉलर्सवर डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार आदी भागातून सुमारे ५०० ते ६०० आदिवासी, माच्छी आदी समाजातील गरीब खलाशी कामगार म्हणून कामाला जात असतात. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पोरबंदर, वेरावल येथील मासेमारी बंद करण्यात आल्याने मरोली, नारगोल, उंबरगाव, कोसंबा आदी भागातून गेलेल्या ट्रॉलर्स माघारी परत आल्या होत्या.गुजरातच्या पोरबंदर, वेरावल आदी बंदरातील ट्रॉलर्सवर कामगार म्हणून कामावर गेलेल्या कामगारांना २७ ट्रॉलर्समधून सुमारे १ हजार ८०० खलाशी कामगार गुजरातच्या नारगोल बंदरात शुक्रवारी (३ एप्रिल) आणण्यात आले होते. त्यांना स्थानिकांनी उतरू दिले नाही. मात्र गुजरात प्रशासनाच्या यशस्वी मध्यस्तीनंतर रविवारी (५ एप्रिल) दुपारी त्यांना उतरविण्याची कार्यवाही सुरू असताना गुजरात राज्यातील फक्त ११२२ कामगारांना ट्रॉलर्समधून खाली उतरविण्यात येऊन त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.उरलेले ६७८ कामगार हे पालघर जिल्हा आणि दमण-सिल्वासातील असल्याने त्यांना उतरविण्यास गुजरात पोलिसांनी नकार दिला. या ६७८ कामगारांना पुन्हा पोरबंदर, वेरावल येथे सोडून देण्याचा अट्टाहास वलसाड पोलिसांनी लावून धरला होता. यादरम्यान दमण-सिल्वासा येथील जिल्हा प्रशासनाने गुजरात प्रशासनाशी बोलून आपल्या कामगारांना ृआपल्या भागात प्रवेश दिल्याचे जिल्ह्यातील कामगारांचे म्हणणे आहे. उर्वरित पालघर जिल्ह्यातील सुमारे ५५० ते ६०० कामगार समुद्रात ट्रॉलर्समध्ये अन्नपाण्यावाचून अडकून पडले असताना त्यांच्या आरोग्याचा, जीविताचा गहन प्रश्न निर्माण झाला असताना महाराष्ट्र सरकारने काही ठोस पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी सोशल मीडियाद्वारे केली होती. मात्र त्यांच्या मागणीकडे शासन पातळीवरून दुर्लक्ष करण्यात आल्याने जिल्ह्यातील या सर्व कामगारांना पुन्हा पोरबंदर, वेरावलमध्ये नेऊन ठेवण्यात आले होते. तेथे त्यांची एनएफएफ या मच्छीमार संघटनेकडून जेवण, पाण्याची व्यवस्था केली जात असताना खलाशांची १८ ते २० हजारांची संख्या पाहता त्यांना मर्यादा येत होत्या. त्यामुळे आम्हाला पुन्हा आमच्या घरी आणण्याची व्यवस्था राज्य शासनाने करावी, अशी मागणी जिल्ह्यातील खलाशांनी केली होती.या खलाशांना सुखरूपपणे त्यांच्या घरी आणण्याची मागणी भाजपचे पदाधिकारी तथा आदिवासी एकता मित्र मंडळ, मनोरचे अध्यक्ष संतोष जनाठे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. जिल्हाधिकाºयांनी राज्याच्या मदत व पुनर्वसन सचिवांना पत्र लिहून गुजरातमध्ये अडकलेल्या जिल्ह्यातील आदिवासी मच्छीमार मजुरांना घरी आणण्याबाबत पत्र पाठवले आहे.उद्धव ठाकरे यांचा गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्कमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातील खलाशांना कुठलाही त्रास न होता योग्य सुविधा मिळाव्यात यासाठी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला असून १४ एप्रिलनंतर त्या खलाशांना पुन्हा आपल्या घरी आणण्याच्या दृष्टीने शासन पातळीवरून प्रयत्न सुरू केले जातील, असे शिवसेनेचे आमदार तथा संपर्क प्रमुख रवींद्र फाटक यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या