शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

तीन तासांत आगीवर नियंत्रण; दोन लाख लीटर पाण्याचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2020 12:44 AM

अडीच हजार ली. फोमचा वापर; ५० जवानांचा समावेश

- पंकज राऊतबोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यात मंगळवारी संध्याकाळी लागलेली भीषण आग नियंत्रणात आणण्यासाठी विविध अग्निशमन दलाचे आठ बंब, ५० जवान आणि काही अधिकाऱ्यांनी तीन तास अत्यंत धोका पत्करुन झुंज दिली. ही आग विझवण्यासाठी जवळपास दोन लाख ली. पाणी तर अडीच हजार ली. फोमचा वापर करावा लागला.

औद्योगिक क्षेत्रातील हरशूल केमिकल्स प्रा.लि. (मे. श्री. साई एंटरप्राइजेस ) प्लॉट नं. टी १०१ या रासायनिक कारखान्याला आग लागल्याची वर्दी महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या तारापूर येथील अग्निशामन दलाला मंगळवारी संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास मिळाली. त्यानंतर काहीच मिनिटांनी तारापूर अग्निशमन दलाची दोन वाहने प्रथम घटनास्थळी पोहोचली. तेव्हा कारखान्याच्या संपूर्ण परिसरात आग पसरली होती. आगीने रौद्ररूप धारण केले होते. तर ज्वलनशील रसायनांची भरलेली पिंपे फुटून आग अधिकच भडकत होती.

बघता बघता आग शेजारच्या केशवा आॅरगॅनिक कंपनीच्या काही भागापर्यंत पोहोचून मोठा धोका निर्माण झाला. अशावेळी सुरक्षेसाठी पाणी मारून, कुलिंग करून आग थोपवून धरल्याने तो कारखाना आगीपासून वाचवण्यात आला. असे असले तरी त्या कारखान्याची एअर हॅन्डलिंग सिस्टीम आणि इलेक्ट्रिक केबल पूर्णपणे जळून गेल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला. दुरुस्तीसाठी काही दिवस कारखाना बंद राहणार असून यात जवळपास एक कोटी रुपयाचे नुकसान झाल्याचे कारखान्याचे मालक डी. के. राऊत यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

आग विझविण्यासाठी एम.आय.डी.सी. अग्निशमन दलाचे ३, बी.ए.आर.सी., पालघर नगर परिषद, डहाणू अदाणी थर्मल पॉवर, डहाणू नगर परिषद, वसई - विरार महानगरपालिका यांच्या अग्निशमन दलाच्या प्रत्येकी एक अशा एकूण ८ गाड्या घटनास्थळी होत्या. त्यांना आठ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला. बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन घटनास्थळी उपस्थित होते. अग्निशमन दलाचे जवान आणि अधिकाºयांएवढीच त्यांचीही भूमिका महत्त्वाची होती.

कारखान्यातील प्लास्टिक ड्रमचा वितळून लगदा केमिकल ट्रान्सफर करताना अर्थिंग दिली असताना स्पार्क होऊन आग लागल्याचे कंपनीच्या मालकांकडून अग्निशमन दलाच्या अधिकाºयांना सांगण्यात आले. या कारखान्यातील कच्च्या आणि पक्क्या मालासहकारखाना जळून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या कारखान्याच्या मार्जिन स्पेसमधेच रसायनांनी भरलेली पिंपे असल्याने आग विझविण्यासाठी अडचणी येत होत्या. त्यावर मात करून तारापूरअग्निशमन दलाचे अग्निशमन अधिकारी मनीष सावंत यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी जीव धोक्यात घालून भीषण आग तीन तासात नियंत्रणात आणली. आगीत हा संपूर्ण कारखाना भस्मसात झाला आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारfireआगMaharashtraमहाराष्ट्र