पंकज राऊतबोईसर : तारापूर एमआयडीसी मधील मोहिनी आॅर्गेनिक्स या कारखान्यात असलेली अग्नीशमन यंत्रणा पुरेशी नव्हती त्यामुळेच ही आग भडकली, असे निष्पन्न झाले आहे.स्पेशॅलिटी केमिकल्स आॅइल बेसचे उत्पादन करणाºया या करखान्यामधील थर्मिक फ्ल्युइल्ड हिटर या प्रकारच्या बॉयलर मधून आगीची छोटी ज्वाळा निघाली ती आग विझविण्याचा प्रयत्न उपस्थित दोन कर्मचाºयांनी उपलब्ध फायर फायिटंगच्या उपकरणाद्वारे केला, तो अपयशी ठरला. त्यामुळे आगीने अल्पवधीत रौद्ररूप धारण केले. ही उपकरणे प्रभावी असती तर आग तत्काळ आटोक्यात आली असती. सोमवारी संध्याकाळी लागलेल्या भीषण आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन जवानांना सात तास झुंज द्यावी लागली तर पहाटे पर्यंत आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. मात्र दुपारपर्यंत कारखान्यातून निघणाºया धुरांवर पाणी फवारणीचे काम सुरु च होते.या आगीमध्ये हा कारखाना व यंत्रसामग्री आणि कच्चा व पक्का माल संपूर्ण जाळून खाक झाला असून मोठे नुकसान झाल्याचा दावा करण्यात येतो आहे. असा प्राथमिक अंदाज आहे. आगीमध्ये मनिंदर कुशवाह हा कामगार किरकोळ भाजला असल्याचे व्यवस्थापनातर्फे तर तीस टक्के भाजल्याचे औद्योगिक सुरक्षा विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.भ्रमणध्वनी ऐवजी दिला टेलिफोन नंबर : औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचानालयाचे डेप्युटी डायरेक्टर पी.ए. पाटील व बिनताळे रात्री पासून घटनास्थळी उपस्थित होते. आज घटनास्थळी आलेले डेप्युटी डायरेक्टर एस जी धवड यांनी पत्रकारांना आगीचे प्राथमिक कारण आणि आगी संदर्भात माहिती देण्यास दुपारी एकच्या सुमारास असमर्थता दर्शविली. त्यांचा मोबाइल नंबर मागितला असता वसई कार्यालयाचा टेलिफोन क्रमांक देण्याचे उपस्थित सहकाºयांना सांगून त्यावर संपर्क साधण्यास सांगितले तर शासनाने आपल्याला भ्रमणध्वनी पुरविला नसल्याने त्याचा क्र मांक देण्यासही नकार दिला. तो पर्यंत धवड यांनी जखमी कामगाराची भेटही घेतली नव्हती. अशा घटना घडू नये या करिता उपाय योजना करण्यात दिरंगाई करणारे अधिकारी घटनेचे कागदी घोडे रंगविण्यात मग्न दिसत होतेल्युपिनने पाणी पुरविल्याने विझवता आली आगही आग विझविण्याकरीता तारापूर अग्निशमन दलाचे चार, तर तारापूर बी.ए.आर.सी., डहाणू रिलायन्स एनर्जी, वसई - विरार महानगरपालिका व पालघर नगरपालिका इत्यादीचे प्रत्येकी एक असे एकूण आठ बंब व त्यांचे पन्नास कर्मचारी, जवान यांनी जीव धोक्यात घालून आगीशी झुंज दिली .आग विझविण्यासाठी साठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासत असल्याने टँकरद्वारे पाणी आणले गेले तर एमआयडीसी च्या फायर हायड्रेनट लाईन मधून पुरेशा दाबाने पाणी येत नसल्याने आग विझविण्यासाठी ल्युपिन लिमिटेड या कंपनीने मोठया प्रमाणात पाणी उपलब्ध करून दिल्याने आग विझविण्यास मदत झाल्याचे तारापूरचे अग्निशमन अधिकारी आनंद परब यांनी पत्रकारांना सांगितले.या कारखान्याच्या लगत असलेले श्रीनाथ केमिकल्स, मीनार केमिकल्स, बर्फ कंपनी हे कारखाने आगीपासून वाचविण्यास अग्निशमन दलास यश आले मात्र प्रिमियम इंटरमीडिएट या कंपनीच्या काहीसा भागापर्यंत आग पोहचून त्यांचे नुकसान झाले. मात्र मुख्य कंपनीपर्यंत आग पोहचू न दिल्याने अनर्थ टळला.
निष्प्रभ उपकरणांमुळे मोहिनी आॅर्गेनिक्सला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2017 1:18 AM