वसंत भोईर वाडा : ठाणे व पालघर जिल्ह्यामध्ये फटाके विक्रीचे अनेक दुकाने असली तरी वाडा येथील फटाक्यांची बाजारपेठ महाराष्टÑ प्रसिद्ध आहे. येथे फटाके हे इतरांपेक्षा स्वस्त आणि दर्जेदार असल्याने घाऊक व किरकोळ असे दोन्ही प्रकारचे विक्रेते आणि ग्राहक येथे खरेदीसाठी प्रचंड संख्येने येत आहेत. फटाके ज्वलनशील असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव ही दुकाने वाडा शहरापासून एक किलोमीटरच्या अंतरावर वाडा त्रिंबकेश्वर रोड वरील देसई गावाच्या हद्दीत थाटली आहेत.प्रीतम ट्रेडर्स, नंदकुमार ट्रेडर्स, दिलीप ट्रेडर्स, प्रसाद ट्रेडर्स व पातकर ट्रेडर्स अशी दुकानांची नावे असून प्रत्येक दुकानात ३५/४० कर्मचारी काम करत असून जवळपास दोनशे कर्मचाºयांना रोजगार मिळाला आहे. या व्यवसायातून वार्षिक करोडो रुपयांची उलाढाल होते. ठाणे पालघर शिवाय मुंबई, रायगड, नगर, रत्नागिरी, नाशिक, नवी मुंबई, धुळे, जळगाव तसेच मराठवाडा, पश्चिम महाराष्टÑ येथून व्यापारी येतात. यावर्षी जी.एस.टी. ही सरकारी कर प्रणाली लागू झाली असली तरी फटाके विक्र ीत मंदी जाणवत नाही दरवर्षीप्रमाणे या वर्षीही दर २५ टक्क्यांनी वाढले आहेत अशी माहिती दिलीप पातकर यांनी दिली.बहुढंगी फटाकेशिवकाशी येथील स्टॅण्डर्ड या कंपनीतून फटाके येत असून मिल्टशॉट, मिल्टबार, हँडरेड शॉट, रोबोट डान्सिंग, फोटो फ्लॅश, चक्री, रॉकेट, फुलबाजा, फुलझाडी, अनार, लवंगी, सुतळी बॉम्ब, लायिटंग थंडर, ५००, १०००, २००० ची लडी असे विविध प्रकारचे ५० रुपयांपासून १५०० रु नगापर्यंतचे फटाके उपलब्ध असून त्या सर्वांनाच प्रचंड मागणी आहे.
फटाका खरेदीस वाडा येथे झुंबड, सर्वात मोठी बाजारपेठ : दर्जेदार आणि स्वस्त मालाची ग्राहकांवर मोहिनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 6:14 AM