पालघर - कोकणातील सहा जिल्हे मत्स्य उत्पादनात समृद्ध आणि अग्रेसर असताना रत्नागिरी जिल्ह्यातील शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालय नागपूरच्या महाराष्ट्र पशु आणि मत्स्यव्यवसाय शास्त्र विद्यापीठाला जोडण्याचा घाट राज्य शासनाकडून घातला जात असून या निर्णया विरोधात महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती आंदोलन उभारणार असल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितले.कोकणातील ठाणे(पालघर), मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अशा या एकूण सहा जिल्ह्यातून सन २००९ च्या सालापर्यंत २१ लाख ४० हजार ९७८ मेट्रिक टन इतके मच्छींचे उत्पादन होत असे. त्यात ठाणे-पालघर मधून ५ लाख ६२ हजार ३४७ टन, मुंबई मधून ८ लाख ४९ हजार ४०२ टन, रायगड जिल्ह्यातून १ लाख ८४ हजार ७४५ टन, रत्नागिरी मधून ४ लाख ४६ हजार ६६३ टन,तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ९७ हजार ८२१ टन मत्स्य उत्पादन होत असल्याचे मत्स्यविभाग सांगतो.त्यामुळे कोकणात विपुल मत्स्य संपदा असताना त्याठिकाणी मत्स्य विज्ञान विद्यापीठाची मागणी पूर्ण करण्या ऐवजी डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाशी संलग्न असलेले रत्नागिरी जिल्ह्यातील शिरगाव येथील मत्स्यविद्यालय विदर्भात हलविण्याच्या हालचालींना सुरुवात झाली आहे. हे महाविद्यालय नागपूरच्या महाराष्ट्र पशु आणि मत्स्यव्यवसाय शास्त्र विद्यापीठाला जोडण्याचा विचार राज्य सरकार सध्या करीत आहे.राज्य सरकारने १९८१ मध्ये शिरगाव येथे मत्स्य महाविद्यालयाची स्थापना केली होती. हे काम सुरळीत सुरू असताना तत्कालीन काँग्रेस सरकारचा २००० मध्ये हे महाविद्यालय नागपूरच्या विद्यापीठाला जोडण्याचा प्रयत्न कोकणातील राजकीय नेत्याच्या विरोधामुळे निष्फळ ठरला होता. आता पुन्हा हे प्रयत्न पुन्हा भाजप सरकारने सुरू केल्याने महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघाचे अध्यक्ष रामदास संधे, महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष नरेंद्र पाटील ठाणे जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती संघाचे अध्यक्ष राजकुमार भाय यांनी या विरोधात आंदोलन उभारण्याचे जाहीर केले आहे. कोकणातील सहा जिल्ह्यात समुद, खाड्या, धरणे, नद्या यांची संख्या मोठी असल्याने मत्स्यउत्पादनाची मोठी संधी आहे. शिरगावच्या मत्स्य महाविद्यालयातून आतापर्यंत १ हजार २०० विद्यार्थ्यांनी पदवी, व ३०० विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.कोकणाच्या विद्यार्थ्यांवर होणार अन्यायच्या महाविद्यालयास भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे मानांकन मिळत असतांना मानांकन नसलेल्या मत्स्यविज्ञान विद्यापीठाशी ते जोडण्याच्या प्रयत्नामुळे कोकणातील विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. तसेच त्याचे मानांकन रद्द होण्याची भीती संधे यांनी व्यक्त केली आहे.च्महत्वाचे म्हणजे नागपूरमध्ये मच्छीमारी साठी आणि त्यांच्या व्यवसायप्रती नैसर्गिक स्त्रोत नसताना सरकार कोकणातील विद्यार्थ्यांवर अन्याय करून ते नागपूरला नेण्याचा प्रयत्न करीत आहे. या विरोधात मच्छीमार संस्था, संघटना, लोकप्रतिनिधी, यांनी आवाज उठवणे गरजेचे आहे.इतर जिल्ह्याच्या मानाने आम्हा कोकणवासियांवर नेहमीच अन्याय होत आला आहे. त्यामुळे सर्वांनी एकजुटीने या निर्णयाविरोधात उभे राहिले पाहिजे.- राजकुमार भाय,चेअरमन-ठाणे-पालघर जिल्हा संघआमचे अनेक प्रकल्प गुजरात आणि मुख्यमंत्र्यांच्या भागात पळविण्याचा प्रयत्न केला जातोय.ह्यावेळीही असा प्रयत्न झाल्यास आम्ही आंदोलन उभारू- रामदास संधे, चेअरमन,महाराष्ट्र राज्य संघ, मुंबई.
मत्स्य महाविद्यालय नागपूरच्या विद्यापीठाला जोडणार, मुख्यमंत्री व भाजपा सरकारचा आणखी एक डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2018 6:24 AM