वसई : मच्छीमारांनी यापुढे मासेमारीचे आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करायला हवे तसेच संचालक मंडळात तरूणांना वाव द्यायला हवा असे उद्गार वसई पाचूबंदर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या सागरी भवनाचे उद्घाटन करताना आ. हितेंद्र ठाकूर यांनी काढले.वसई पाचूबंदर येथे वसई सागरी कोळी मच्छीमार संस्थेतर्फे नवीन कार्यालय उभारण्यात आले. त्याचे उद्घाटन आ. हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते झाले. विरोधासाठी विरोध हा प्रगतीला मारक ठरतो. मतभेद, वाद, भांडणे असायला हवी परंतु त्यातून चांगले काही निष्पन्न झाले पाहिजे. अनेकदा मच्छीमारांसाठी असणाऱ्या प्रकल्पांना केवळ अज्ञानातून विरोध होतो. त्यामुळे प्रकल्प आधी समजून घ्या व आपले किती नुकसान होईल याचा विचार करा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सहकाराच्या माध्यमातुन समाजाचा उत्कर्ष होऊ शकतो. सहकारामध्ये मोठी ताकद आहे. मासेमारी व्यवसायाला महानगरपालिकेकडून सर्वोतोपरी सहकार्य मिळेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. कार्यक्रमामध्ये सहा. मत्स्य व्यवसाय आयुक्त रविंद्र वायडा, स्थायी समिती सभापती नितीन राऊत, मच्छीमार समाजाचे नेते फिलीप मस्तान व दयानंद कोळी यांची भाषणे झाली. (प्रतिनिधी)
‘मच्छीमार समाजाने आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारावे’
By admin | Published: October 06, 2015 11:21 PM