पालघर/बोर्डी
पालघर जिल्ह्यातील प्रस्तावीत वाढवण बंदराला विरोध करणाऱ्या स्थानिकांना पालघर सिडको येथे होणाऱ्या भूमिपूजन समारंभासाठी निषेध नोंदविण्यासाठी जाताना, पोलिसांनी रोखले. त्यामुळे मच्छिमारांनी आपल्या बोटी समुद्रात घालून त्याला काळे झेंडे आणि फुगे लावून वाढवण बंदराला आपला विरोध आणि रोष व्यक्त केला.
वाढवन बंदराच्या विरोधातील संघर्ष करणाऱ्या संघटनासह सर्व मच्छीमार आणि स्थानिक शेतकरी बागायतदारांना पोलिसांनी आपल्या आपल्या भागातच रोखून धरले आहे. त्यामुळे भूमिपूजनाच्या ठिकाणी येऊन विरोध करण्याचे स्थानिकांचे मनसुबे पोलिसांच्या बंदोबस्तामुळे फेल झाले आहेत. मात्र आपला विरोध दर्शवण्यासाठी डहाणू सातपाटी, वडराई, मढ,वसई आदी भागातील मच्छीमारांनी आपल्या बोटी समुद्रात घालून आपला निषेध व्यक्त केला.