शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा

By admin | Published: October 09, 2015 11:31 PM

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढणार असल्याने समुद्र खवळलेला राहणार असून मुसळधार पावसाची शक्यता पाहता कोकण किनारपट्टीवरच्या मच्छीमारांनी

पालघर : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढणार असल्याने समुद्र खवळलेला राहणार असून मुसळधार पावसाची शक्यता पाहता कोकण किनारपट्टीवरच्या मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा आपत्ती व्यवस्थापनाकडून देण्यात आला आहे. परंतु, पालघर जिल्ह्यातील २ ते ३ हजार मच्छीमार नौका अनेक दिवसांपासून खोल समुद्रात मासेमारीला गेल्या असल्याने किनारपट्टीवर चिंतेचे वातावरण पसरले आहे.पालघर जिल्ह्यातील वसई, अर्नाळा, उत्तन, नायगाव, एडवण, केळवे, सातपाटी, वडराई, मुरबे, नवापूर, उच्छेळी-दांडी, डहाणू, बोर्डी इ. किनारपट्टीवरील गावांमधून सुमारे २ ते ३ हजार लहानमोठ्या नोका मच्छीमारीसाठी खोल समुद्रात गेल्या आहेत. या नौका नेहमीच मुंबई, जाफराबाद इ. भागांत ४० ते ५० सागरी मैलांपर्यंत माशांच्या थव्यांच्या शोधात जात असतात. सॅटेलाइटद्वारे मिळालेल्या चित्राद्वारे कमी दाबाचा पट्टा हा गोवा आणि मुंबईच्या मध्यभागाकडे सरकत असून पश्चिम व दक्षिण दिशेने ४१० किमी गोव्याचे दिशेने तर मुंबईपासून ६१० किमी अंतरावर हा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. येत्या २४ तासांमध्ये त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता असून समुद्र खवळलेला राहून मुसळधार पाऊसही कोसळणार आहे. त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीला जाऊ नये, असा इशारा जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी दिला आहे. या इशाऱ्यानंतर सातपाटी येथील सर्वोदय सहकारी संस्था व मच्छीमार सहकारी संस्थेच्या वतीने समुद्रातील आपापल्या बोटींना वायरलेस सेटद्वारे सूचना देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे सर्वोदयचे चेअरमन सुरेश म्हात्रे यांनी लोकमतला सांगितले. परंतु, वातावरणातील बदलामुळे वायरलेस सेटवरून अनेक बोटींचा संपर्क होऊ शकत नसल्याचेही ते म्हणाले. (वार्ताहर)