शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

मच्छीमारच पापलेट वाचवणार

By admin | Published: May 08, 2016 2:55 AM

सातपाटी, मुरबे येथील मच्छिमारांकडून पापलेटच्या पिल्लांची चाललेली बेसुमार मासेमारी (कत्तल) रोखण्यास मत्स्य व्यवसाय विभाग हतबल ठरला असतांना सातपाटीमधील दोन्ही

- हितेन नाईक,  पालघरसातपाटी, मुरबे येथील मच्छिमारांकडून पापलेटच्या पिल्लांची चाललेली बेसुमार मासेमारी (कत्तल) रोखण्यास मत्स्य व्यवसाय विभाग हतबल ठरला असतांना सातपाटीमधील दोन्ही प्रमुख मच्छिमार सहकारी संस्थांनी एकमुखी निर्णय घेत लहान पापलेट आपल्या शीतगृहात न ठेवण्याचा व बोटी धारक, तसेच व्यापाऱ्यांना बर्फ न देण्याचा निर्णय घेतला आहे.पापलेट मासा हा मच्छिमारांना अधिक आर्थिक उत्पन्न देणारा म्हणून सर्वत्र ओळखला जात असून सातपाटी, मुरबे, डहाणू, अर्नाळा, वसई, उत्तन, नायगाव आदी हजारो मच्छिमार नौकाधारकांचा आर्थिकस्तर उंचावण्याच्या दृष्टीने या माशांचा मोठा वाटा आहे. परंतु मागील १२ ते १५ वर्षांपासून एप्रिल ते मे महिन्यात जन्माला येणाऱ्या लहान पापलेटच्या पिल्लांची कत्तल मच्छिमारांकडून मोठ्या प्रमाणात केली जात असल्याने पापलेटच्या उत्पादनाची मोठी घसरण सुरु आहे. या लहान पिल्लांची मासेमारी करणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी कायद्यात तरतूद नसल्याने काही मच्छिमार आपला स्वार्थ साधण्यासाठी बेसुमारपणे मासेमारी करीत आहेत. महाराष्ट्र मासेमारी नियम अधिनियमन १९८१ अन्वये कायद्यात या लहान माशांच्या पिल्लांची मासेमारी करणाऱ्यांना कायद्याच्या कक्षेत आणून शिक्षेची तरतूद करण्यासाठी मच्छिमार संघटनांनी चालविलेल्या प्रयत्नांना शासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे ठाणे जिल्हा मच्छिमार संस्थेचे अध्यक्ष नारायण विंदे यांनी सांगितले. या अभिनव निर्णयामुळे पापलेटचे किती संवर्धन होते, ते लवकरच कळेल.सातपाटी पापलेटची संख्या प्रचंड घटलीसातपाटी व मुरबे येथील काही मच्छिमार करप्याडोलीने मासेमारी करताना पापलेटच्या लहान पिल्लांची मासेमारी करीत असल्याने पापलेटची मोठी घसरण झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ३ लाख २३ हजार ९३३ किलो पापलेटचे उत्पादन कमी झाल्याचे दिसून आले आहे. मच्छिमारांना आर्थिक सुबत्ता देणाऱ्या या माशाची संख्या प्रचंड घटली आहे ती वाढविण्यासाठी मस्त्यव्यवसाय विभागाकडून पावले उचलत नसल्याचे मच्छिमारांचे मत आहे. त्यामुळे सातपाटी मधील सातपाटी मच्छिमार सहकारी संस्था व सातपाटी सर्वोदय सहकारी संस्थेने लहान पापलेटच्या पिल्लांची मासेमारी करणाऱ्यावर कायदेशीर कारवाईबरोबर त्यांना बर्फ देण्यास बंदी घातली होती. लहान पापलेटच्या खरेदी-विक्रीवर परिणाम होऊन दर घसरल्याने कव मासेमारी करणाऱ्या १५० ते २०० मच्छिमारांनी आज सर्वोदय सहकारी संस्थेत घुसून धुमाकूळ घातला. सुरेश म्हात्रे यांना घेराव घालून आमच्यावर निर्बंध लादण्याबरोबर उत्तन, वसई, अर्नाळा भागातील मच्छिमारांच्या मासेमारीचे काय? असा प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे काही काळ वातावरण तंग बनले होते.