शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

तुफानी लाटांमुळे मासेमारी धोक्यात

By admin | Published: July 21, 2015 5:02 AM

एकीकडे पावसाळ्याला अजून नीटशी सुरुवातही झाली नसताना दुसरीकडे समुद्रातील तुफानी वादळी वातावरणही (खराट) अजून संपलेले नाही

हितेन नाईक , पालघरएकीकडे पावसाळ्याला अजून नीटशी सुरुवातही झाली नसताना दुसरीकडे समुद्रातील तुफानी वादळी वातावरणही (खराट) अजून संपलेले नाही. त्यामुळे पुढील महिन्यात समुद्रात कधीही वादळी वारे, तुफानी लाटा निर्माण होऊ शकतात, या हवामान खात्याच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर १ आॅगस्टपासून समुद्रात मासेमारीला जाण्याबाबत मच्छीमारांमध्ये भीतिदायक वातावरण आहे. अशा वेळी जीवित वा वित्तहानी झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न मच्छीमार विचारू लागले आहे.महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ अन्वये मागील अनेक वर्षांपासून १० जून ते १५ आॅगस्ट किंवा नारळी पौर्णिमेपर्यंत मासेमारीच्या पावसाळी बंदीचा कालावधी घोषित करण्यात येत होता. त्यामुळे नारळी पौर्णिमेला सागराची परंपरेप्रमाणे विधिवत पूजा करून नारळ अर्पण केल्यानंतरच मच्छीमार आपल्या बोटी समुद्रात पाठवित असल्याची प्रथा होती. याच दरम्यान शासनाच्या मच्छीमारांच्या विकासविषयक धोरणात दिवसेंदिवस विपरीत बदल करण्यात आल्यामुळे मच्छीमारांचे अनेक वर्षांपासूनचे प्रलंबित प्रश्न सुटण्याऐवजी त्यात वाढ झाली. त्यातच समुद्रातील बोटींच्या संख्येत झालेली वाढ व पर्ससीन नेटसारख्या विनाशकारी जाळ्यांमुळे दिवसेंदिवस मत्स्य उत्पादनात घट होऊ लागली. त्यामुळे मत्स्य दुष्काळाचे संकट परंपरागत मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांच्या डोक्यावर घोंघावू लागले. अशा वेळी शासनस्तरावरून निवेदने, मोर्चे, आंदोलने करूनही धनाढ्य ट्रॉलर्सधारकांना छुपा पाठिंबा मिळाला. वारंवार प्रयत्न करूनही शासनाकडून अपेक्षित पाठिंबा मिळत नसल्याने शेवटी ठाणे, पालघर व गुजरात राज्यातील काही मच्छीमार संघटना, सहकारी संस्था एका व्यासपीठावर एकत्र आल्या व मत्स्य दुष्काळाचे संकट दूर करण्याच्या दृष्टीने १० जूनपासून पावसाळी मासेमारी बंदी कालावधी असताना सर्व मच्छीमारांनी १५ मेपासूनच स्वयंस्फूर्तीने निर्णय घेत आपला मासेमारी व्यवसाय बंद करून बोटी किनाऱ्यावर लावल्या. मे महिन्यात अंडीधारक (गाबोळीवाले) व लहान पापलेटच्या पिलांची कत्तल होऊ नये, यासाठी पोटाला चिमटा काढून घेण्यात आलेल्या या निर्णयाचा सकारात्मक बदल मच्छीमारांत दिसून आला व पापलेटचे व चांगले आर्थिक उत्पन्न देणारे मासे मच्छीमारांच्या जाळ्यात मिळू लागल्याने मच्छीमारही सुखावले होते. त्यामुळे या वर्षीही मच्छीमारांनी मे महिन्यातच घेतलेल्या या निर्णयाला शासनाकडून पाठिंबा मिळेल व मच्छीमार संघटनांंनी पाळलेल्या ९२ दिवसांच्या पावसाळी बंदीचा सकारात्मक विचार होईल, अशी मच्छीमारांची धारणा होती.