वसई - येथील ऐतिहासिक ओळख असलेल्या वसईच्या किल्ल्यामध्ये आजपासून किल्ले वसई परिवाराच्या मोहिमेस सुरु वात होत असून या मोहिमेअंतर्गत ३६ गडांवर दि.१८ व दि.१९ आॅगस्ट या दोन दिवसांत ध्वज (तिरंगा ) फडकावून त्याला मानवंदना दिली जाणार आहे. शनिवारी सकाळी ठीक. ७.०० वाजता या मोहिमेची सुरवात वसईच्या चिमाजी अप्पा स्मारकातून होईल. यावेळी होणाऱ्या कार्यक्र मास वसईतील किल्ले प्रेमी नागरिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मंडळी उपस्थित राहणार आहेत. तसेच या मोहिमेचा समारोप रविवारी सायंकाळी डहाणूच्या किल्यावर होईल.देशाच्या पहिल्या ध्वजाला १११ वर्ष पूर्णस्वातंत्र्यप्राप्ती पर्यंत ३२ ध्वज उदयाला आले. हा तिरंगा ३५ वा होता. आणि यंदा या ध्वजाला एकूण १११ वर्षे पूर्ण होत आहेत. भारताच्या राष्ट्रध्वजाची संकल्पना शतकापूर्वी समोर आली होती. जर्मनीतील स्टुटगार्ड शहरात २२ आॅगस्ट १९०७ रोजी भरलेल्या जागतिक समाजवाद्यांच्या परिषेदेत भारताच्या मादाम भिकाई कामा यांनी साकारलेला ध्वज याठिकाणी सादर केला होता.पहिली मिरवणूकविशेष म्हणजे त्यावेळी सन १९३७ मध्ये मादाम कामा आणि सहकारी यांनी या पहिल्या राष्ट्रध्वजाची मिरवणूकच चक्क त्यावेळी पुणे शहरात काढली होती. त्यावेळी पुण्यात केसरीवाडा ते रेल्वेस्थानक मार्गावर काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत स्वातंत्र्यवीर सावरकर सुद्धा सहभागी झाले होते.केसरीवाड्यात जतनया संपूर्ण ध्वजाच्या आरेखनात सावरकरांचे योगदान होते. हिंदू मुस्लिम ऐक्य साधण्याच्या उद्दात्त हेतूने त्यांनी या ध्वजावर सूर्य आणि चंद्र या चिन्हांना स्थान दिले होते हे सुद्धा तितकेच सत्य आहे. आणि आजही हा पहिला राष्ट्रध्वज पुण्याच्या केसरीवाड्यात जतन करून ठेवण्यात आला आहे.
किल्ले वसई परिवाराची ३६ गडांवर ध्वज मोहीम, आजपासून सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 1:59 AM