विक्रमगड : विक्र मगड येथील मलवाडा गावातून जाणाऱ्या पिंजाळ नदीला आलेल्या पुरामुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाणी शिरल्याने कर्मचारी व ५ रु ग्णांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. पिंजाळ नदीने रौद्ररूप धरण केले असून ३९ घरात पुराचे पाणी शिरल्याने १५० नागरिकांना समाजमंदिर येथील सुरक्षितस्थळी प्रशासनाने हलवले आहे. दरम्यान, कावळे येथील महंत बालकनाथ बाबा यांच्या मठात नदीचे पाणी शिरल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.पावसाचा जोर असाच राहिला तर मलवाडा व पीक गावातील घरांमध्ये पाणी शिरून मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने वाडा-जव्हार राज्य मार्गावरील पिंजाळ नदीवरील मलवाडा पूल वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक विक्र मडमध्ये ३०५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून तांबाडी नदी, साखरापूल, नागझरी बंदारा, विक्र मगचा ओव्हळ ,खांड, मुँहू खुर्द लघु पाटबंधारे ओव्हर फ्लो झाल्याने जव्हार-वाडा, विक्रमगड-वाडा, पालघर-विक्रम गड, जव्हार-विक्र मगड, विक्र मगड-डहाणू या मार्गावरील वाहतूक दिवसभर बंद पडली होती. त्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल झाले. तर या अतिवृष्टीने तालुक्यातील माण गावातील शांताराम जवळया भोये यांचे घर कोसळल्याने नुकसान झाले आहे. दरम्यान, प्रशासनाने नदी,नाले किनारी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
विक्रमगडमधील पिंजाळ नदीला आला पूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2019 11:23 PM