शहरं
Join us  
Trending Stories
1
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
2
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
3
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
5
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
6
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
7
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
8
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
9
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
10
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
11
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
12
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
13
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

बनावट कागदपत्रे, शिक्के बनविणारी टोळी गजाआड; तब्बल ५५ इमारती संदर्भात घोटाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2023 3:36 PM

इतक्या मोठ्या प्रमाणात कागदावर, शिक्के मिळाल्याने वसईत घरे खरेदी करणाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.

नालासोपारा (मंगेश कराळे) : वसई, विरार शहरातील तब्बल ५५ इमारतींच्या वेगवेगळ्या शासकीय कार्यालयातून लागणाऱ्या परवानग्यांचे बनावट कागदपत्रे तसेच परवानग्यांसाठी लागणारे ११५ बनावट शिक्के बनवणाऱ्या पाच आरोपींच्या टोळीला विरार पोलिसांनी गजाआड केले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात कागदावर, शिक्के मिळाल्याने वसईत घरे खरेदी करणाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. आरोपीकडून सिडको आणि मनपाचे ११०० लेटरपॅडही हस्तगत केल्याची माहिती सोमवारी विरार पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. पाचही आरोपींनी स्वत:च्या आर्थीक फायदयासाठी शासनाचा कोटयावधी रुपयाचा महसुल बुडविल्याचे तपासात निषन्न झाले आहे.

विरारच्या कोपरी परिसरात इमारत परवानगीसाठी लागणारी कागदपत्रे, सही, शिक्के, सर्च रिपोर्ट, रेरा नोंदणी या बनावट कागदपत्रांच्या आधारे दोन विंगची रुंद्रान्क्ष नावाची पाच मजली अनधिकृत इमारत बांधण्यात आली होती. मनपाने निष्काषनाची कारवाई करून सदनिकांना सील लावल्यानंतरही सील तोडुन सदनिका रहिवास करण्यासाठी देऊन मनपाची व सदनिका घेणाऱ्या नागरिकांची फसवणुक केल्याप्रकरणी मनपा सहाय्यक आयुक्त गणेश पाटील यांनी ९ फेब्रुवारीला विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. विरार पोलिसांनी गुन्ह्याचा तपास व चौकशी सुरू केली. पोलिसांनी विरार येथील दोन कार्यालयातून मे. रूद्रांश रियल्टर्स तर्फे विकासक/जमिन मालक दिलीप कैलास बेनवंशी (३१), मे. मयुर इंटरप्रायजेसचा मालक मच्छिन्द्र मारूती व्हनमाने (३७), फिनीक्स कार्पोरेशनचे मालक दिलीप अनंत अडखळे (४०), मे. रूद्रांश रियल्टर्सचे भागीदार प्रशांत मधुकर पाटील (३३) आणि रबर स्टॅम्प बनविणाऱ्या राजेश रामचंद्र नाईक (५४) यांना अटक करण्यात आली. 

विरार पोलिसांनी तपासात अटक आरोपीच्या कार्यालयातून वसई विरार परिसरातील ५५ अनाधिकृत इमारती बांधण्यासाठी लागणारे वसई विरार मनपा तसेच त्यापूर्वी अस्तित्वात असलेली सिडको यांचे कार्यालयाचे सीसी, ओसी, ठाणे जिल्हाधिकारी यांचेकडील एन ए परवानगी, वसई दुय्यम निबंधक कार्यालयात सादर केलेले दस्त, तहसिलदार कार्यालय यांचेकडील जागा मालक यांच्या जागा गावठाण असल्याबाबतचे नाहकरत प्रमाणपत्र, सर्च रिपोर्ट तसेच इतर बनावट कागदपत्र त्याचप्रमाणे बांधकाम मंजूरसाठी लागणारे विविध शासकीय कार्यालयाचे एकूण ११५ बनावट शिक्के, रेरा ऍथॉरिटीची दिशाभुल करून रेरा नोंदणी केलेले कागदपत्रे, तसेच बनावट सीसी बनविण्यासाठी लागणारे मनपाचे ६०० लेटरपॅड, सिडकोचे ५०० लेटरहेड, ५५ इमारतींचे बनावट कागदपत्रांच्या फाईल्स, बनावट शिक्के बनवण्यासाठी लागणारी लोखंडी मशीन, बनावट शिक्के बनविण्याची वापर केलेली मशिन हा सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची कामगीरी पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय, अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक, पोलीस उपायुक्त सुहास बावचे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली विरारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे, पोलीस उपनिरीक्षक तात्या सावंजी, सहाय्यक फौजदार सुरेंद्र शिवदे, पोलीस अंमलदार दिलीप चव्हाण यांनी केलेली आहे.

आरोपींना शासकीय यंत्रणेतील कोणीतरी अधिकाऱ्यांचा पाठींबा असल्याचा संशय आहे. इमारतींच्या फाईलीतील कागदपत्रे तपासणे सुरू आहेत. कॉम्प्युटरचे हार्डडिस्क रिपोर्टकरिता पाठवलेले आहे. या इमारतीमधील सदनिकांना कर्ज देणाऱ्या बँकांच्या अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी करणार आहे.- राजेंद्र कांबळे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक व तपास अधिकारी, विरार पोलीस ठाणे)