शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

माजी आमदार विवेक पंडीत ठरले मुंबई विद्यापीठाचे टॉपर, M.A. ला 94 % गुण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2021 9:15 PM

विद्यार्थीदशेत तथा महाविद्यालयीन शिक्षणाच्या दरम्यान त्यांना विविध चळवळीन आकर्षित केलं होतं. तर शालांत परीक्षेत म्हणजेचं एस एस सी परीक्षेत विवेक पंडित यांना फक्त 48 टक्के गुण मिळाले हो

ठळक मुद्देआता वयाच्या 64 व्या वर्षी त्यांनी अगदी नेटाने अभ्यास करून एम ए (राज्यशास्त्र) या पदव्युत्तर विशेष पदवी परीक्षेत तब्बल 94 टक्के गुण संपादित केले आहेत 

वसई - उभं आयुष्य आदिवासी बांधवांसाठी घालवणारे श्रमजीवी संघटनेचे सर्वेसर्वा व वसईचे माजी आमदार विवेक भाऊ पंडित यांनी वयाच्या 64 व्या वर्षी मुंबई विद्यापीठातून एम. ए. (राज्यशास्त्र)  परीक्षा विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. राज्यशास्त्र या विषयात त्यांनी मुंबई विद्यापीठातून प्रथम येण्याचा विशेष बहुमान प्राप्त केला असून या विशेष परीक्षेत त्यांनी 94 टक्के गुणांची कमाई केली आहे.

दरम्यान, विद्यार्थीदशेत तथा महाविद्यालयीन शिक्षणाच्या दरम्यान त्यांना विविध चळवळीन आकर्षित केलं होतं. तर शालांत परीक्षेत म्हणजेचं एस एस सी परीक्षेत विवेक पंडित यांना फक्त 48 टक्के गुण मिळाले होते आणि त्यांनतर त्यांना पदवी परीक्षेच्या दरम्यान ते सातत्याने चळवळीत व्यस्त असल्याने अवघ्या 38 टक्के गुणांसह ते पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले होते. मात्र, आता वयाच्या 64 व्या वर्षी त्यांनी अगदी नेटाने अभ्यास करून एम ए (राज्यशास्त्र) या पदव्युत्तर विशेष पदवी परीक्षेत तब्बल 94 टक्के गुण संपादित केले आहेत 

आपल्या या भरघोस यशानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना माजी आमदार पंडित यांनी आपण आयुष्यभर स्वतःला विद्यार्थी समजत असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे तर आपण सतत काहींना काही शिकत राहिल्यानं  आपण विद्यार्थी असल्याची वारंवार खात्री होतच राहते. तसेच आपण इतरांना शिक्षणासाठी नेहमी प्रवृत्त करीत आलो आहोत,आता इतरांना अधिक हक्काने शिक्षणासाठी प्रवृत्त करता येईल, असेही ते म्हणाले. अर्थातच अभ्यास व शिक्षणामुळे मनाची कवाडं खुली होतात. तर अधुन मधून नवनवीन विचारांची त्यामध्ये भर देखील पडते व त्याचा एकूणच व्यक्ति मत्वाला विविधांगी फायदाही होत असतो. विद्यार्थीदशेत असताना चळवळीमुळे अभ्यासाकडे विशेष असे लक्ष देता आलं नाही, त्यामुळे शैक्षणिक प्रगती यथातथाच राहिली खरी, परंतु खरंच आपण खूप शिकावं अशी वडिलांची मनोमन इच्छा होती. या इच्छेला काही प्रमाणात तरी न्याय देता आल्याची भावना भाऊंनी यावेळी व्यक्त केली. आपल्या बालपणातील शिक्षणाशी  निगडित काही आठवणींना त्यांनी यावेळी उजाळा दिला आहे. आता यापुढील टप्प्यात भारताच्या संसदीय लोकशाही व्यवस्थेतील संसदीय समित्या व अमेरिकेतील संसदीय समित्या आता विकास प्रक्रिया याचा तौलनिक अभ्यास करून शेवटी शोधनिबंध लिहिणार असल्याचं ही माजी आमदार पंडित यांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :MLAआमदारMumbai Universityमुंबई विद्यापीठcorona virusकोरोना वायरस बातम्या