नालासोपारा : नालासोपारा शहरातील वाढती लोकसंख्या व पर्यायाने वाढती गुन्हेगारी लक्षात घेता पोलीस प्रशासनाने दिनांक ५ मार्च २०१५ रोजी तुळींज पोलीस ठाण्याची निर्मिती केली होती. घाईघाईत तयार करण्यात आलेले या ठाण्याचे बांधकाम चक्क एका गटारावर करण्यात आले आहे. ५ वर्षे होऊन सुद्धा आजही पोलीस ठाणे गटारावरच उभे आहे. ते स्थलांतर करण्यासाठी शोधाशोध करूनही अद्याप जागा उपलब्ध होत नसल्याचे वृत्त आहे.
एकीकडे नालासोपारा शहरात शाळा, बगिचे, रुग्णालये यासाठी आरक्षित जागेवर मोठ्याप्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली आहेत. तर दुसरीकडे महापालिका प्रशासनाकडून पोलिस ठाण्याला डी.पी.आराखड्यात आरक्षित जागाच ठेवण्यात आलेली नाही. गटारावर उभारण्यात आलेल्या पोलिस ठाण्यात पावसाळ्यात तर गटाराचे पाणी तुंबून परिसर जलमय होतो. तुळींज पोलिस ठाण्यांतर्गत पोलिस अधिकारी व कर्मचारी मिळून १५० हून अधिक जणांचा स्टाफ काम करीत असून त्यांना अत्यंत दुर्गंधीयुक्त वातावरणात काम करावे लागत आहे. पोलिस ठाणे एका गटारावर उभे असल्यामुळे गटाराच्या दुर्गंधीमुळे पोलिसांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.जागेचा शोध सुरू आहेत. ती उपलब्ध होताच हे स्टेशन स्थलांतरित होईल. सध्या सुरू असलेले स्टेशन तात्पुरते आहे.- विजयकांत सागर ,अप्पर पोलीस अधीक्षक, वसईही आदिवासींची जागा असून त्यावर अतिक्र मण करून पोलीस ठाणे उभारले आहे. त्यांनी माझ्याशी पत्रव्यवहार केलेला नाही. जर त्यांनी या संदर्भात संपर्क केला तर जागा मिळवून देईन. -खा. गावितपोलिसांनी प्रस्ताव पाठवावा जर प्रस्ताव कोणत्या सरकारी विभागात अडकला तर संबंधित खात्याच्या मंत्री किंवा अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नक्कीच पाठपुरावा करेन. - क्षितिज ठाकूर, आमदारकुठे जागा असेल तर मला सांगावे पोलीस स्टेशन बांधून देण्यासाठी मनपाकडून सर्वाेतोपरी मदत करणार. चौक्या, उपविभागीय पोलीस कार्यालय बांधून दिली आहेत- रु पेश जाधव, महापौर