पंकज राऊत बोईसर : तारापुर एमआयडीसीतील चार कंपन्या बंद करण्याचे आदेश केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिला असून त्याने त्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे पत्र महावितरणच्या अधिक्षक अभियंत्यांना दिले आहे.कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये केमको डायस्टफ, अभिलाषा टेक्स केम प्रा. ली., अमरज्योत केमिकल कॉर्पोरेशन, श्री विनायक इंडस्ट्रीज हे चार उद्योग असून हे अती प्रदूषण करणाºया उद्योगाच्या यादीतील आहेत कुठल्या प्रतिचे रासायनिक प्रदूषित सांडपाणी सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे (सी ई टी पी) पाठविण्यात येते, हे कळून यावे यासाठी अशा उद्योगांनी आॅनलाईन मॉनेटरिंग सिस्टीम बसविणे सक्तीचे असतांनाही या उद्योगांनी ती न बसविल्याने ही करवाई करण्यात आली आहे. यामुळे बाकीच्या प्रदूषणकारी उद्योगांचे धाबे दणाणले असून अशीच कारवाई आणखी काही कंपन्यांवर होण्याची शक्यता आहे.मंडळाला भीती सुनावणीचीमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाळाने मागील ८ महिन्यांत ६४ उद्योगावर करवाई केली असून तारापूर एमआयडीसीतील उद्योगातून व सामुदायिक केंद्रातून (सी ई टी पी) प्रक्रिया न करताच प्रचंड प्रमाणात रासायनिक प्रदूषित सांडपाणी सरळ नवापूरच्या समुद्रात आणि नाल्यामध्ये सोडले जाते आहे.त्यामुळे पर्यावरणाची हानी होत असून त्याचे अनेक परिणाम किनारपट्टी भागातील मच्छीमार व शेतजमीनीवर होत असल्याची याचिका अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेने पुण्याच्या राष्ट्रीय हरित लवादा कडे दाखल केल्या नंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने डिसेंबर २०१६ पासून विशेष मोहीम हाती घेतली आहे.११ सप्टेंबरला राष्ट्रीय हरित लावादाकडे या संदर्भात सुनावणी असल्याने तिच्या भीतीने अजून काही उद्योगांवर करवाई होण्याची शक्यता असून त्या त्याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
चार कंपन्या केल्या बंद, ऑन लाइन मॉनेटरिंग न बसवल्याने कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 5:30 AM