पारोळ : वसई विरार महापालिकाच्या वतीने वैतरणा येथील फणसपाड्यातील सरस्वती विद्यालयातील ११५ मुला-मुलींना सायकलींचे वाटप करण्यात आले. यावेळी महिला व बालकल्याण समिती सभापती भारती देशमुख, नगरसेवक हार्दिक राऊत, नगरसेवक दिलीप गोवारी, चार्टड अकाऊंटंट कल्पक चुरी, जिल्हा परिषद सदस्य कल्याणी तरे, जयश्री किणी तसेच वैतरणा ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष डी. के. पाटील उपस्थित होते. शिक्षणासोबत विद्यार्थ्यांच्या क्रीडा व कलागुणांना उभारी मिळावी यासाठी वसई -विरारमधील काही ट्रस्ट प्रयत्नशील आहेत. श्री जीवदानी देवी मंदिर ट्रस्ट, ओम श्री साईधाम मंदिर ट्रस्ट, विवा ठाकूर चॅरीटेबल ट्रस्ट , वाय.के.पाटील चॅरीटेबल ट्रस्ट, तारामती हरिश्चंद्र ठाकूर चॅरीटेबल ट्रस्ट, शनी मंदिर ट्रस्ट वाघोली, मुलजीभाई मेहता चॅरीटेबल ट्रस्ट, मंगलमूर्ती मंदिर ट्रस्ट, स्वयंभू महादेव मंदिर ट्रस्ट बोळींज, आनंद विहार (बालाजी मंदिर) ट्रस्ट बोळींज,विमलनाथ जैन मंदिर यांच्या माध्यमातून शैक्षणिक व क्रीडा साहित्याचे वाटपही करण्यात आले. माजी नगरसेवक जितूभाई शहा, प्रशांत चौबळ, हरिषभाई धरोडा, किरण ठाकूर यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले.या क्र ीडा साहित्यात कॅरमबोर्ड, व्हॉलीबॉल, क्रिकेट, बुद्धीबळ व इतर क्रीडा साहित्य संच देण्यात आले. विद्यांर्थ्यांना पादत्राणे व रायटींग पॅड वाटण्यात आले.
सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थिनींना मोफत सायकली
By admin | Published: January 09, 2017 6:18 AM