पालघर : या जिल्ह्यात शिक्षकांची आधीच मोठी कमतरता आहे. त्यात भर पडून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ठाणे जिल्हा परिषदांतील ज्या शिक्षकांची पालघर जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. त्यांना ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी तातडीने मुक्त करावे व त्यांना त्यांच्या नव्या नियुक्तीच्या स्थानी हजर होऊ द्यावे असे निर्देश ग्रामविकामंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांच्या दालनात सोमवारी झालेल्या बैठकीत दिले.पालघर जिल्ह्यात बदली झाल्याने येणाºया शिक्षकांची संख्या ४९ आहे. एवढ्याच शिक्षकांना सेवाज्येष्ठतेनुसार जिल्ह्याबाहेर पाठविण्यात यावे. नंतरच्या टप्प्यात उर्वरित शिक्षकांना पालघर जिल्ह्यातून कार्यमुक्त केले जावे. कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना नजीकच्या शाळेत सामावतांना नदी, नाले, रेल्वे, हायवे, दºया-खोºया ओलांडाव्या लागणार नाहीत याचे भान राखावे, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.यावेळी आदिवासी विकासमंत्री व पालघरचे पालकमंत्री विष्णू सवरा, आमदार पास्कल धनारे, पालघरचे आमदार अमित घोडा, ग्रामविकास सचिव असीम गुप्ता, ठाणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार, पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी व अन्य अधिकारी उपस्थित होते.
पालघरला बदली झालेल्या शिक्षकांना मुक्त करा - मुंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 1:42 AM