तलवाडा : तालुक्यातील चांगली विकास कामे करणारी कुंर्झे ग्रामपंचायतीला स्मार्ट ग्रामपंचायत पुरस्कार १ में २०१७ रोजी पालक मंत्री तथा आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते प्रमाण पत्र व दहा लाख बहाल करण्यात आले. मात्र, याच ग्रामपंचायतीतील काही विकास कामात आंदाधुंद कारभार केल्याची धक्का दायक माहिती माहितीच्या अधिकारात समोर आली आहे.कुंर्झे ग्रामपंचायत पैकी गवळीपाडा येथील जुनी विहिर दुरूस्ती करणे कामी २०१५-१६ या आर्थिक वर्षामध्ये १४ वित्त आयोगाच्या निधीतून रू. ७२,२८५/ मंजुर करण्यात आले. मात्र विहीर दुरूस्ती न करताच पुर्ण रक्कम हडप्प करण्यात आल्याचा आरोप करण्यात आले आहे. येथील विजय पवार याने गट विकास अधिकारी विक्र मगड यांच्याकडे चौकशी अर्ज दि. २२ फेब्रुवारी २०१८ ला सादर करून दोन महिने उलटले तरी चौकशी अधिकारी व विस्तार अधिकारी एम. एम. सपकाळे यांनी चौकशीच पुर्ण केली नाही.या प्रकारामुळे कुंर्झे गवळीपाडा येथील ग्रामस्थांनी १६ एप्रिल २०१८ ला ही विहिर दुरूस्ती झालीच नाही फक्त गवळीपाडा येथील बोरवेलचे काम चालू असतांना तेथील थोडे सिमेंट पाणी घेऊन गवळीपाडा या विहिरीच्या गोलाईवर टाकण्यात आल्याची तक्रार १९ एप्रिल ला दिला आहे. त्यात गवळीपाडा विहिर दुरूस्ती झालीच नाही. या संदर्भात विक्रमगड पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता कदम यांनी तत्कालीन ग्रामसेवक याना कारणे व विहिरी दुरूस्ती माहिती घेऊन कार्यालयात येणे पत्राद्वारे कळवले होते.विहिर दुरूस्ती करिता कामावर मजुरांच्या हजेरी पटावरील पैकी काही मजुराला गवंडीचे कामच करता येत नाही तरीही त्याच्या नावे १५ दिवस मजुरी रक्कम अदा केल्याची नोंद करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या भ्रष्टाचाराची योग्य चौकशी करून गट विकास अधिकारी यांनी कारवाई करावी अशी मागणी पवार यांनी केली आहे.
विहिरींची दुरूस्ती न करताच निधी हडप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2018 12:29 AM