विरार : गेल्या आठवड्यात नालासोपारा वसई विरारमध्ये मोठ्या प्रमाणत पूरपरिस्थित निर्माण झाली होती. त्याचवेळी एका पार्थिवाची रिक्षा वरून अंत्ययात्रा काढावी लागली. ही रिक्षा चालणे शक्य नसल्याने तिला धक्का मारून स्मशानभूमीपर्यंत नेण्याची वेळ मयत व्यक्ती च्या कुटुंबीयावर आली होती.मयत व्यक्ती ही नालासोपारा पश्चिममधील पांचाल नगर येथील राहणारी होती. वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त सतीश लोखंडे यांनी मयत व्यक्तीच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.>पालिकेकडून मलमपट्टी सुरूपालीकेचे अधिकारी हे प्रेत्यक विभागातील सोसायटी जाऊन नागरिकांची तपासणी करत आहेत, जर कोणीही आजरी आढळले तर त्याच्यावर उपचार केले जात आहेत. तसेच कितेक सोसायटीच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये दुषित पाणी गेले होते त्यामुळे पाणी शुद्ध करण्यासाठी पालिकेकडून टीएलसी (टेरेफाथॉयल क्लोराइड) पावडर देण्यात येत आहे. ३०० हून जास्त सोसायटयांच्या टाकीतील पाणी आता शुद्ध झाले असून ते पिण्यासाठी वापरले जाऊ शकते. त्याचप्रमाणे कीटकनाशके आणि डास प्रतिबंधक औषधांची फवारणीही केली जात आहे असे लोखंडे यांनी सांगितले.
नालासोपाऱ्यात रिक्षावरून काढली अंत्ययात्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 2:19 AM