डहाणू : डहाणूच्या पश्चिम किनारपट्टीवरील धाकटी डहाणू येथील शेकडो महिलांना कपडे धुण्यासाठी आधार असलेल्या एकमेव गाव तलावाला अनेक ठिकाणी भगदाड पडल्याने तलावातील पाणी वाहून जात असल्याने त्याच्या पाण्याची पातळी कमी झाली आहे. परिणामी दररोज सुमारे ३०० ते ४०० महिलांना पाण्यात उभे राहून कपडे धुण्याची वेळ आली आहे. या बाबतीत अनेक वेळा तक्रार करून ही ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करीत असल्याने येथील महिलांत संताप व्यक्त केला जात आहे.सुमारे आठ ते दहा हजार लोकसंख्या असलेल्या या ग्रामपंचायत हद्दीत ब्रिटिशकालीन गाव तलाव आहे. त्यात वर्षभर पाण्याचा साठा असल्याने दररोज येथे शेकडो महिला कपडे धुण्यासाठी येत असतात. त्यामुळे पंचायत समितीने बांधकाम करून तलावात पायºया बांधल्या आहेत. परंतु या वर्षी मुसळधार पाऊस पडूनही तलाव भरला नाही. कारण त्याला अनेक ठिकाणी मोठमोठी भगदाडे पडली आहेत. त्यामुळे तलावातील पाणी वाहून जात असते.दरवर्षी जुलै महिन्यात हा तलाव ओसंडून वाहत असतो. त्यामुळे येथील महिलांना वर्षभर कपडे धुण्याची चिंता नसते.मात्र या वर्षी ग्रामपंचायतीने तलावाच्या देखभाल, दुरूस्तीकडे दुर्लक्ष केल्याने त्याची पडझड होऊन अनेक ठिकाणी भगदाड पडली आहेत.येथील ग्रामस्थांना आठ, पंधरा दिवसाने वाडापोखरण नळ पाणीपुरवठा योजनेचे पाणी दिले जाते. धा. डहाणू हे गाव शेवटच्या टोकावर असल्याने येथे प्रेशरने पाणी येत नसल्याने येथील ग्रामस्थांनी पाणी साठवून ठेवावे लागते, अशी ग्रामस्थांची तक्रार आहे.धा. डहाणू गावातील नागरिक गेल्या चार पाच वर्षापासून साठवून ठेवलेले दूषित पाणी पित असतात अशी परिस्थिती असताना कपडे धुण्यासाठी कुठून पाणी आणणार असा सवाल येथील महिला करीत असतात. डहाणूच्या पंचायत समितीने याकडे लक्ष देवून तातडीने तलावाला पडलेली भगदाडे बुजवावीत व ढासाळलेल्या किनाºयाची व त्यालगतच्या पायºयांची दुरूस्ती करण्याचे आदेश संबंधित ग्रामपंचायतीला देण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत
ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 1:27 AM