शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
3
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
4
'गद्दारांना तुरुंगात टाकू'; सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
5
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
6
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
7
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
8
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
9
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना सवाल; "खरी शिवसेना कधीही..."
10
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
11
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
12
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
13
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
14
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
15
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
16
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
17
Video: तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
18
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
19
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद

कचरा वर्गीकरणाचा निव्वळ फार्स 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 1:18 AM

मीरा-भार्इंदरमध्ये ओला व सुका कचरा वर्गीकरणाचा निव्वळ फार्स ठरला आहे. राजकारणी केवळ राजकारणच करत असल्याने वर्गीकरण बारगळले आहे. बेकायदा उत्तन डम्पिंगमुळे स्थानिकांमध्ये असंतोष पसरला आहे.

धीरज परब  मीरा रोड : मीरा-भार्इंदरमध्ये ओला व सुका कचरा वर्गीकरणाचा निव्वळ फार्स ठरला आहे. राजकारणी केवळ राजकारणच करत असल्याने वर्गीकरण बारगळले आहे. बेकायदा उत्तन डम्पिंगमुळे स्थानिकांमध्ये असंतोष पसरला आहे. शहरातील जागोजागी बेकायदा कचराकुंड्यांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. स्वच्छता व कचºयाची विल्हेवाट लावण्यात महापालिका सपशेल अपयशी ठरली आहे. मात्र, नागरिकांच्या माथी कर लादून कोट्यवधींची कंत्राटे मात्र नियमित काढली जात आहेत. घनकचरा अधिनियम काही नवीन नाही. येथील राजकारणी व महापालिका प्रशासनालाही याची कल्पना होती. राज्य सरकारने उत्तनच्या धावगी येथे घनकचरा प्रकल्प उभारण्यासाठी महापालिकेस कोट्यवधींचा भूखंड विनामूल्य दिला. परंतु, या घनकचरा प्रकल्पासाठीच्या राखीव जागेत राजरोस बेकायदा बांधकामे झाली. माफियांनी सरकारी जागा बळकावण्याचा सपाटा लावला असताना महापालिका प्रशासनाने बघ्याची भूमिका घेत केवळ ‘अर्थ’कारण जपले, जेणेकरून बांधकामांना अभय मिळालेच, शिवाय त्यांना वीज, पाणी, करआकारणी आदी सर्व सुविधा पालिकेने दिल्या. नेत्यांनीही केवळ व्होट बँक म्हणून या बेकायदा बांधकामांना पाठीशी घातले. घनकचरा प्रकल्पाच्या जागेत अतिक्रमण व बेकायदा बांधकामांकडे कानाडोळा करणाºया महापालिकेने ज्या उद्देशासाठी सरकारने भूखंड दिला, तो उद्देशदेखील कचºयात मिळवला. घनकचरा प्रकल्प उभारण्याच्या नावाखाली पालिकेने चक्क बेकायदा डम्पिंग ग्राउंडच तयार केले. कुठलीही शास्त्रोक्त प्रक्रिया न करताच बेकायदा टाकल्या जाणाºया कचºयामुळे दुर्गंधी पसरली. आगीमुळे होणाºया धुराने प्रदूषण वाढले. कचºयातील घातक लिचेटने परिसरातील शेती नष्ट केली. विहिरींचे पाणी दूषित झाले. पर्यावरणासह आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. महापालिका व राजकारण्यांना या बेकायदा डम्पिंगचे काहीच सोयरसुतक नव्हते आणि नाही. संपूर्ण शहराचा कचरा उत्तनसारख्या निसर्गरम्य भागात आणून टाकताना पालिकेने येथील नागरिकांचा विचारच केलेला नाही. जेव्हा प्रकल्प वरसावे येथे स्थलांतर करण्याचा प्रस्ताव आला, तेव्हा भाजपाच्या नरेंद्र मेहता यांनी जोरदार विरोध केला. शिवाय, त्यांच्या परिचित असलेल्या व्यक्तीने उच्च न्यायालयात याचिका केली. वरसावे भागात मेहतांच्या कुटुंबीयांचे सीएन रॉक हॉटेल असल्याचे कारणही गाजले होते. घनकचरा प्रकल्पासाठी ओला व सुका कचरा वेगळा करणे अत्यावश्यक असल्याची कल्पना असताना तसेच नियमातही तरतूद असताना महापालिका व राजकारण्यांनी नागरिकांना सुरुवातीपासून त्यासाठी प्रेिरत केलेच नाही. साफसफाईसाठी कोट्यवधींची कंत्राटे देणे व डम्पिंगसाठीही कोट्यवधी खर्च करणे, यातच सर्वांनी स्वारस्य दाखवले. ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी नागरिकांमध्ये १० वर्षांपूर्वीच जर जनजागृती सुरू करूनअंमलबजावणीसाठी कायद्याचा बडगा उगारला असता, तर पालिकेवर हरित लवाद व उच्च न्यायालयात नामुश्की ओढवली नसती. परंतु, पालिकेला न्यायालयाचीदेखील भीती वा सन्मान राहिलेला नसून तेथेही हातोहात खोटे बोलून वा खोटी माहिती देऊन वेळ मारून नेण्यात पालिका तरबेज झाली आहे.  आजही शहरात ओला व सुका कचरा वेगळा केला जात नाही. जे नागरिक वा संस्था प्रामाणिकपणे कचरा वेगळा करून देतात, पण तोच कचरा पालिका मात्र एकाच गाडीत एकत्र करून नेते. मध्यंतरी ओला व सुका कचरा वेगळा करून न देणाºया इमारतींचा कचरा न उचलण्याची भूमिका पालिकेने घेतली. पण, निवडणुका असल्याने राजकीय दबावाखाली पालिकेने नमते घेतले. कचºयाचे वर्गीकरण करणाºया नागरिक व इमारतींना पालिकेने करात विशेष सवलत दिली पाहिजे. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना अंमलात आणल्या पाहिजेत. पण, पालिका मात्र केवळ कागदावर जनजागृतीसाठी लाखो रुपये खर्च करण्यातच स्वारस्य दाखवत आहे. करवसुलीसाठी जशा नळजोडण्या तोडल्या जातात, तशा कचरा वेगळा न करणाºयांच्या नळजोडण्या तोडण्याची हिंमत पालिकेत नाही. पालिकेलाही कचरा वर्गीकरणात स्वारस्य नाही. त्यांना स्वारस्य केवळ निविदा देण्यातच आहे. महापालिका व कंत्राटदाराच्या करारात कंत्राटदाराने प्रत्येक घर, इमारतीमधून कचरा गोळा करून न्यायचा आहे. पण, शून्य कचराकुंडीचे शहर म्हणून खोटा दावा करणाºया पालिकेला शहरातील गल्लोगल्ली झालेल्या बेकायदा कचराकुंड्या मात्र दिसतच नाहीत. या बेकायदा कचºयाकुंड्यांमुळे परिसरात दुर्गंधी पसरतेच, शिवाय रोगराईची भीती राहते. पालिकेचे सफाई कर्मचारी तर ठिकठिकाणी कचरा गोळा करून सरळ जाळून टाकतात किंवा मोकळ्या तसेच कांदळवनात कचरा ढकलून टाकतात. पालिकेची बंदिस्त गटारेही कचरा व गाळाने भरलेली असतात. शहरात सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकायचा कुठे म्हटले तर छोटे डबे नाहीत. गल्लीबोळा, रस्ते तसेच अंतर्गत गटारांची सफाई काटेकोर होत नाही. शहराचा पालिकेने उकिरडा करून टाकला आहे. पण, त्याचे सोयरसुतक ना प्रशासनाला आहे ना राजकारण्यांना. स्वच्छ सुंदर मीरा-भार्इंदर, उघड्यावर प्रातर्विधीमुक्त मीरा- भार्इंदर आदी फसव्या घोषणा व बोधवाक्ये केवळ नागरिकांच्या पैशांमधून उधळपट्टी करण्यापुरतीच आहेत.  डम्पिंगप्रकरणी महापौर, आयुक्त, उपायुक्त यांच्या विरुद्धप्रदूषण नियंत्रण महामंडळ फौजदारी दावा दाखल करते. हरित लवाद आयुक्तांविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी करते. शहरातील नवीन बांधकाम परवानगी व भोगवटा दाखला देण्यास बंदी घालण्याचा इशारा लवादाला द्यावा लागतो.नागरिकही जाब विचारत नाहीतडम्पिंगविरोधात उत्तनकरांना रक्त सांडावे लागते, अशी एक ना अनेक प्रकारे नामुश्की ओढवूनही पालिका प्रशासन व राजकारण्यांचे डोके ठिकाणावर आलेले नाही. दुर्दैवाने नागरिकांमधूनही महापालिका व राजकारण्यांना जाब विचारला जात नाही. त्यामुळे स्वच्छतेबाबतीत काहीही फरक पडलेला नाही.