नालासोपारा : वीज ग्राहकांना केंद्रस्थानी ठेऊन वीज अधिकारी व कर्मचाऱ्यांना काम करण्याची गरज आहे. तसेच, वीज ग्राहकांना विजेचे बिल अचूक व मुदतीमध्ये मिळायला हवे, वीज ग्राहकाच्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी पावले उचला असे स्पष्ट निर्देश पालघर लोकसभा खासदार राजेंद्र गावित यांची विज अधिकार्यांना शनिवारी वसई रोड पुर्व येथील एम. एस. ई. बी. संकुल हॉल येथे संध्याकाळी झालेल्या बैठकीत दिले.
आपण मालक नाही तर सेवक आहोत या भावनेने काम करण्याची गरज आहे, ग्राहकांच्या समस्या तातडीने सोडवा, अश्या अनेक सूचना महावितरण अधिकारी यांना दिल्या. वसई तालुक्यात वीज ग्राहकांना येणारी भरमसाट बिले, वारंवार खंडित होणार वीज पुरवठा, अनियमति व अनियंत्रित वीज पुरवठा त्यामुळे होणारे नुकसान, घरगुती व व्यावसायिक ग्राहकांना या सर्वच होणारा मानिसक ताप व आर्थिक भुर्दंड, याचा पाढा मोठ्या संख्येने उपस्थित वीज ग्राहक व राजकीय कार्यकर्त्यानी खासदार व अधिका-यांसमोर वाचला. त्याला उत्तर देताना महावितरण च्या अधिकार्याची होणारी दमछाक पाहून राजेंद्र गावित यांनी परत एक मिहन्यात बैठक घेऊन सर्व समस्यांची किती सोडवणूक झाली याचा पून्हा आढावा घेऊ तसेच आपण पुन्हा या बैठकीला उपस्थित राहू असे आश्वासन दिले.
महावितरणची ग्राहक सेवा, पायाभूत सुविधा, वीज मीटर ची कमतरता, किनारी भागात तसेच शहरी भागामध्ये भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यासाठीची उपाय योजना या संबधी तातडीने काम करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्याची ग्वाही यांनी उपस्थिताना दिली. महावितरण चे सदोष व उशिरा मिळणारी बिले कर्मचाºयाचा अरेरावीपणा तसेच वीज वितरण व्यवस्थमधील बिघाड यामुळे ग्राहकांना होणारा मनस्ताप व आर्थिक भुर्दड सहन करावा लागतो त्यामुळे यावर तातडीने उपाययोजना करून पुढच्या बैठकीमध्ये याचा अहवाल सादर करावा असे यावेळी सांगण्यात आले.