अनिरु द्ध पाटील / डहाणूसर्वच क्षेत्रात डिजिटलायझेशन होत आहे. मात्र महाराष्ट्र गुजरात सीमेवरील घोलवड पोलीस ठाण्याचा कारभार अनेक वर्षांपासून भाड्याच्या खोलीतूनच सुरू आहे. दरम्यान, सीमाक्षेत्र आणि समुद्रकिनाऱ्याच्या महत्वाच्या भागाची सुरक्षा डिजिटल यंत्रणेद्वारे करण्याची आवश्यकता अधोरेखित होत आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यावेळी कसाब आणि त्याच्या सहकाऱ्यांनी याच सागरी मार्गाचा वापर केला होता. त्यामुळे हा भाग संवेदनशील आहे.महाराष्ट्र गुजरात सीमेलगत पालघर जिल्ह्याच्या उत्तरेला डहाणू आणि तलासरी तालुक्यातील काही भागांची सुरक्षा घोलवड पोलीस ठाण्यामार्फत केली जाते. यामध्ये दहा ग्रामपंचायती आणि ‘अ’ तसेच ‘ब’ विभागातील अनुक्र मे आठ व अकरा या सह एकूण बावीस गावांचा समावेश आहे. ५१.२१ चौरस किमी क्षेत्रांतर्गत ६४,४४१ लोकसंख्येचा प्रदेश अरबी समुद्र आणि पश्चिम घाटाने व्यापला आहे. पश्चिम रेल्वेवरील घोलवड, बोर्डी रोड या सह लगतच उंबरगाव (गुजरात) ही रेल्वे स्थानकं आहेत. सीमेलगत गुजरात राज्य तसेच दीव-दमण, दादरा व नगरहवेली हे दोन केंद्रशासित प्रदेश आहेत. तर वायव्यला विस्तीर्ण अरबी समुद्र पसरला असून पलीकडे पाकिस्तानची समुद्र सीमा आहे. मागील काही वर्षात गुजरात औद्योगिक वसाहतीच्या विस्तारामुळे नोकरीनिमित्त परगावतून येणाऱ्या नागरिकांसह कारखान्यासाठी लागणारा कच्च्यामालाची आयात आणि पक्क्या मालाची निर्यात करणाऱ्या वाहनांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. डहाणू-बोर्डी या राज्य मार्गावर झाई आणि चिखले येथे सागरी तर झाई ते नारायण ठाणा या प्रमुख जिल्हा मार्गावरील वेवजी येथे पोलीस चौकी आहे. पुढे हा मार्ग तलासरी येथे राष्ट्रीय महामार्गाला जोडला जातो. त्यामुळे दिवसभर वाहनांची वर्दळ असते. दमण दारू आणि गुटखा यांच्या तस्करी करिता हे अतिसंवेदनशील क्षेत्र मानले जाते. तरीही ही दुरावस्था आहे.तोकडे पोलीस बळच्घोलवड पोलीस ठाण्याअंतर्गत या विस्तीर्ण प्रदेशाच्या सुरक्षेची भिस्त ३ अधिकारी आणि ४५ पोलिसांवर आहे. त्या पैकी साप्ताहिक सुट्टी, आजारपणाची व अन्य प्रकारच्या रजा, न्यायालयीन कामकाज अशा विविध कामानिमित्त हे सर्वच पोलीस प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात उपलब्ध नसतात. त्यामुळे येथे अधिक पोलिसांची आवश्यकता आहे. च्शिवाय मुख्य पोलीस ठाण्यासह तीन चौक्यांमध्ये सीसीटीव्हीने प्रणाली कार्यान्वित करणे तसेच बिनतारी संदेश यंत्र घेऊन धावणाऱ्या जीपला जीपीएस तंत्रज्ञानाद्वारे थेट पालघर पोलीस मुख्यालयाशी चोवीसतास जोडली जाणे अत्यंत निकडीचे ठरलेले आहे. महासंचालकांच्या संकल्पनेला मुहूर्त केव्हा?राज्याच्या पोलीस महासंचालकांनी प्रत्येक जिल्ह्यात दोन स्मार्ट पोलीस ठाणे करण्याची संकल्पना मांडली असून पालघर जिल्हा वगळता अन्यत्र मुहुर्तमेढ रोवली गेली आहे. सीमा भागातील घोलवड पोलीस ठाणे स्मार्ट होणे काळाची गरज आहे. फक्त चिखले चौकीसाठी ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध केल्याने दोन वर्षांपूर्वी तिला स्वत:ची इमारत मिळाली आहे. या परिसरात उपलब्ध जागेचा पर्याय पाहता येथे स्मार्ट पोलीस ठाणे अस्तित्वात येऊ शकते. येथून डहाणू न्यायालय आणि नव्याने अस्तित्वात येणारी पोलीस अधिकारी व कर्मचारी वसाहत जवळ असणार आहे. त्यासाठी फक्त पालघर पोलीस अधिक्षकांनी तत्काळ निर्णय घेऊन पाठपुरावा करणे आवश्यक आहे.
घोलवड पोलीस ठाणे आजही भाड्याच्या खोलीत
By admin | Published: February 21, 2017 5:18 AM