शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

तापाच्या रुग्णांची त्वरित माहिती द्या, नागरिकांमध्ये पुन्हा कोरोनाची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 11:41 PM

जिल्हाधिकाऱ्यांचे खासगी डाॅक्टरांना आदेश : ग्रामीण भागातील काेराेनावाढीने चिंता

लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : ग्रामीण भागातील ॲॅलोपथी, होमिओपॅथीसह बोगस पदवीधारक डॉक्टरांकडून ताप, खोकला, सर्दी अशा कोरोनासदृश लक्षणे आढळणाऱ्या रुग्णावर उपचार केले जात असल्याने ग्रामीण भागात काेराेना झपाट्याने पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी कडक पावले उचलून सर्व डॉक्टर आणि खाजगी रुग्णालये, लॅब यांनी तापाच्या रुग्णांची माहिती देणे बंधनकारक केले आहे. पालघर जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात काेराेनाची आकडेवारी वाढत आहे. १ फेब्रुवारीला ७२ काेराेनाबाधितांची संख्या शुक्रवारपर्यंत १३० वर पाेहाेचल्याने चिंता वाढली आहे.जव्हार तालुक्यात ३७ विद्यार्थ्यांसह ३ शिक्षक व अन्य सेंट्रल किचनमधील १६ कर्मचारी असे ५६ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघड झाले आहे. काही विद्यार्थ्यांना ताप, खोकला आल्यानंतर त्यांच्या तपासणीनंतर त्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसह ५६ लोकांना बाधा झाल्याचे वास्तव समोर आले. आश्रमशाळा व्यवस्थापनाने मुलांची तपासणी वेळीच केल्याने ही बाब उघड झाली आहे; पण आजही ग्रामीण भागातील ताप, सर्दी, खोकल्याचे हजारो रुग्ण गाव-पाड्यातील डॉक्टरकडे जाऊन उपचार करून घेत आहेत. त्यांची कोरोनाबाबतची अँटिजन, अँटिबॉडी, आरटीपीसीआर आदी चाचण्या केल्या जात नसल्याने बाधितांची नेमकी संख्या समोर येणे शक्य होत नाही. 

बाधितांचा शोध घेण्यासाठी मोबाइलमध्ये उभारलेली ॲप्स आणि जीपीएस यंत्रणा ही आताच्या घडीला बंद असल्याने  जिल्हाधिकाऱ्यांनी पालघर जिल्ह्यातील मेडिकल प्रॅक्टिस असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशन, रुरल मेडिकल असोसिएशन, बीएएमएस ग्रॅज्युएट असोसिएशनना पत्र पाठवले आहे. या पत्रात जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने तापाच्या रुग्णांचे  सर्वेक्षण आवश्यक आहे. त्यामुळे  खाजगी आरोग्य संस्थेत, क्लिनिकमध्ये तापाचे रुग्ण तपासणीसाठी आल्यास जवळच्या कोविड केअर सेंटर, हेल्थ सेंटर येथे अँटिजेन, आरटीपीसीआरसाठी पाठवून त्यांचे नाव, नंबर आणि पत्ता ई-मेलद्वारे cspalghar@gmail.com वर तत्काळ पाठवण्याचे आदेश दिले आहेत.

विनवळच्या आठवडा बाजारावर बंदी

जव्हारमध्ये सात नवे काेराेना रुग्ण : नागरिकांमध्ये पुन्हा भीती

जव्हार : कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याचे काही दिवसांपासून दिसत आहे. त्यामुळे विनवळ ग्रामपंचायतीने गावातील आठवडा बाजारावर बंदी घालण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला. काही दिवसांपूर्वी विनवळ येथील सेंट्रल किचनचे १६ कर्मचारी व शुक्रवारी तीन कर्मचारी असे एकूण १९ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे शहरात भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे विनवळ ग्रामपंचायतीने विनवळ कार्यक्षेत्रात आठवडे बाजार भरविण्यास सक्त मनाई केली आहे. ग्रामपंचायत क्षेत्राबाहेरील व्यक्तींना ग्रामपंचायत क्षेत्रात येण्यास मनाई करण्यात आली आहे. 

दरम्यान, शुक्रवारी नवीन सात रुग्णांची भर पडली असून, यातील विनवळ येथील एक अधीक्षक व दोन सेंट्रल किचनचे कर्मचारी तर हिरडपाडा शाळेतील तीन रुग्ण व इतर एक असे नवीन सात रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. सद्य:स्थितीत जव्हार तालुक्यात ७९ रुग्णांची नोंद केली आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpalgharपालघर