सात वर्षांपासून एकही योजना राबवली नाहीसात वर्षांपूर्वी आम्हाला पंचायत समितीच्या अनुदानातून विंधण विहीर मिळाली. त्यानंतर मात्र, आजपर्यंत कोणतीही योजना आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही. वा या योजनांची आम्हाला कोणतीच माहिती मिळत नाही. आम्ही शेती करतो, त्यासाठी औजारे उपलब्ध नसतात. ती आम्हाला मिळायला हवीत. त्यामुळे आम्हाला त्याचा फायदा होईल. आज शासनाने ज्या योजना राबवल्या आहेत, त्या आमच्यापर्यंत कधी आल्या नाहीत.- भादन शिवा टोपले, वासिंद, शहापूरअटल सोलर योजनेने जीवनमान बदललेआज शेतकऱ्यांसाठी शासनाने अनेक योजना आणल्या आहेत. त्या अनेक योजनांचा लाभ शेतकरी घेत आहेत. मी माझ्या शेतावर चार लाख रु पयांची ९५ टक्के सबसिडीची मुख्यमंत्री अटल सोलर योजना राबविल्याने मला शेतीला खूप फायदा झाला आहे. यामुळे माझे जीवनमान बदलले. मात्र या योजना तालुक्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक असून यामुळे शेतकºयांचा मोठा फायदा होईल. शेतकºयांना शासनाने या योजनांविषयी व्यवस्थित माहिती दिल्यास त्या सर्वांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.- स्वामी विशे, तुटे, शहापूर.योजनांचा लाभ केवळ ठरावीक व्यक्तींनाचआज सरकारी योजना या केवळ राजकीय नेत्यांच्या जवळ असणाºया कार्यकर्त्यांनाच कळतात. आणि यात फायदा देखील त्यांचाच होतो. शेतकºयाला आपल्या शेतीत हमी भाव मिळत नसल्याने तो निराश आहे. शासनाने आणलेल्या कोणत्याही योजनेचा लाभ मला आजपर्यंत मिळालेला नाही. वा त्याविषयी काही माहितीही कधी आम्हाला मिळाली नाही. शासन मोठमोठ्या करखान्यांना अनेक सवलती देऊन वारेमाप पैसे देते आणि ते माफ देखील करते. मात्र आम्हा शेतकºयांना ही सवलत मिळत नाही.- भाऊ पांढरे, तुटे, शहापूरहमी भाव न मिळाल्याने होतो मोठा तोटाशेतकरी शेती पिकवतो, मात्र त्याला ते धान्य विकताना हवा तसा हमी भाव मिळत नाही. त्यामुळे त्याचा मोठा तोटा होतो. हमीभाव मिळाल्यास त्याचा शेतकºयाला निश्चितच फायदा होईल. शेतकºयांना लागणारी औजारे, त्यासाठी असणाºया योजना या शेतकºयांपर्यंत पोहोचवायला हव्यात. मात्र अशा कोणत्याही योजना आमच्यापर्यंत पोहोचत नाहीत, हेच आमचे दुर्दैव. आज तालुक्यातील कारखान्यांना अनेक प्रकारच्या सवलती दिल्या जातात त्या मानेने शेतकºयांना मात्र अशा सवलती मिळत नाहीत.- अनंता मांजे, खरिवली, शहापूरसरकारकडून अपेक्षा कराव्यात तरी कोणत्या?शेतकºयांसाठी कोणत्या कोणत्या शासकीय योजना आहेत त्या त्यांनाही माहीत नसतात. माहीत असतात त्या केवळ राजकीय नेत्यांना. शासनाने अनेक प्रकारची खाती आम्हाला उघडायला सांगितली आहेत. आम्ही या खात्यात पैसे जमा करू असे सांगितले. रोजगार नसला तरी आम्ही तुम्हाला रोजगाराच्या रूपात पैसे जमा करू असे सांगितले. त्यामुळे आम्ही खाती उघडली. मात्र आजपर्यंत या आमच्या खात्यात एक रु पयाही जमा झालेला नाही. त्यामुळे या सरकारकडून आत कोणत्या अपेक्षा कराव्यात हाच मोठा विषय आहे.- बाळू धोंडू भोईर, लोनाड, शहापूर
शेतमालाला भाव, दुष्काळात साथ एवढे दिले तरी खूप झाले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2019 3:40 AM