अनिरुद्ध पाटील
डहाणू/बोर्डी : समुद्रकिनारी सुरूबागा धूप नियंत्रण आणि पर्यावरण संवर्धन करीत असून त्या अविवेकी पर्यटकांकडून लक्ष्य होत आहेत. बागांमध्ये चारचाकी वाहने उभी करणे, प्रेमीयुगुलांचे अश्लील वर्तन, आगीच्या घटनांची पुनरावृत्ती यामुळे पर्यावरणाचा ºहास होत असून प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला जात आहे.
डहाणू तालुक्याला ३३ कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला असून किनारपट्टीच्या धूप नियंत्रणाकरिता सुरू झाडांची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे अशा गावांचे निसर्गसौंदर्य आणि जैवविविधतेत वाढ झाली आहे. अन्य गावाच्या तुलनेत चिखले समुद्रकिनारा आणि सुरूबाग लोकवस्तीपासून सुमारे ४०० मीटर अंतरावर असल्याने या निर्मनुष्य परिसराचा फायदा अविवेकी पर्यटक घेत आहेत. सुरूबागेत थेट चारचाकी वाहने पार्क करणे, प्रेमीयुगुलांचे अश्लील वर्तन, चूल पेटवून स्वयंपाक करणे, मद्यपान करून कचरा फेकणे आदींमुळे बकाल अवस्था आली आहे. नुकताच व्हॅलेंटईन डे साजरा करण्याकरिता पवनचक्की येथील सुरूबागेत दिवसभर पन्नासपेक्षा अधिक चारचाकी वाहने पार्क करण्यात आली होती. परगावातील पर्यटकांनी अश्लील वर्तनाने कळस केला. मद्याच्या बाटल्या, खाद्य पदार्थाचा कचरा फेकला, धूम्रपान केले. सायंकाळी सहाच्या सुमारास बागेत वणवा लागल्याची घटना घडली. मात्र खुलेआम सुरू असलेल्या अश्लील चाळ्यांमुळे इच्छा असूनही व्यायामाला येणाऱ्या स्थानिकांना बागेत मदतकार्य करण्याची हिंमत झाली नाही.दरम्यान, भरती आणि जोराच्या वाºयाने आग अधिकच पसरल्यावर स्थानिक पर्यावरणप्रेमी महेश सुरती यांनी पुढाकार घेत अन्य ग्रामस्थांच्या मदतीने आग विझवली. येथे आठवड्यातून दोन वेळा आगीच्या घटनेची पुनरावृत्ती झाली. परंतु अविवेकी पर्यटकांचा वाढता हस्तक्षेप रोखण्यात स्थानिक प्रशासनदुर्लक्ष करीत आहे. वन विभागाकडून वृक्षारोपण करण्यात आले असलेतरी वनाखालील क्षेत्र वनविभाग, महसूल, ग्रामपंचायतयापैकी कोणाच्या अखत्यारीत येते याची स्पष्टता नसल्याने कारवाईहोत नाही.सायंकाळच्या सुमारास सुरू बागेत मोठ्या प्रमाणात आग लागून पसरली. व्यायामाकरिता स्थानिक चौपाटीवर होते. मात्र बागेत पर्यटकांचे अश्लील चाळे सुरू असल्याने आग विझविण्याकरिता कोणीच पुढाकार घेत नव्हते. अखेर पर्यावरणप्रेमींच्या मदतीने आग आटोक्यात आणली. अविवेकी पर्यटकांवर कारवाईची अपेक्षा आहे.- महेश सुरती, सुरूबागेत आग विझविणारा स्थानिक