- शौकत शेखडहाणू : घोलवड, डहाणू, बोर्डी तसेच परिसरातील हजारो चिकू बागायतदारांना आर्थिक वैभव मिळवून देणाऱ्या तसेच सुमारे पाच हजार आदिवासी कामगारांना रोजगार देणा-या जगप्रसिध्द घोलवडचे चिकू गेल्या दोन, तीन महिन्यापसून आर्थिक संकटात सापडल्याने त्याच्यावर अवलंबुन असलेल्या शेतकरी तसेच आदिवासी मजूर हवालदिल झाले आहेत. गुजरात राज्यात चिकूचे प्रचंड उत्पन्न सुरू असल्याने चिकूच्या भावात दिवसेंदिवस घसरण होत चालल्याने डहाणू येथील चिकू लिलाव केंद्रात शुकशुकाट दिसत आहे.देशातच नव्हे तर जगाच्या नकाशावर नावजलेला घोलवडचा चिकू गेल्या दोन, तीन महिन्यापासून संकटात सापडला आहे. डहाणू , पालघर, तलासरी तालुक्यात सुमारे पंचवीस हजार हेक्टर जमीनीवर चिकूची लागवड असल्याने चिकूच्या हंगामात दररोज एक हजार ते १५०० टन चिकू डहाणूच्या लिलाव केंद्रात येत असतात.सध्या चिकूचा हंगाम नसला तरी दररोज दीडशे टन चिकूची बजारात खरेदी, विक्री होत आहे. परंतु राजस्थान, मुंबई, जयपूर सोबतच दिल्ली येथील बाजारपेठेत चिकूची मागणी कमी असल्याने चिकूचे भाव गडगडले आहेत.सध्या बाजारात द्राक्ष, संत्रे, मोसंब, पेरू, आंबे, जांबु तसचे इतर फळांचे हंगाम सुरू असल्याने चिकूची मागणी कमी झाली आहे. डहाणूच्या लिलाव केंद्रात घोलवडचे चिकू आठ ते दहा रूपये सरासरीने खरी विक्री केली जात असल्याने शेतकरी, बागायतदार, अडचणीत सापडला आहे.विशेष म्हणजे चिकू तोडण्याची मजूरी तीन ते चार रूपये किलो बरोबरच खत, वाहतूक खर्च वाढल्याने बागायदार आर्थिक अडचणित सापडला आहे.ज्याप्रमाणे जम्मू काश्मीर येथे मोठ मोठया सफरचंदच्या बागा आहेत. त्या प्रमाणेच पालघर जिल्हयातील डहाणू, तलासरी तालुका चिकू हा चिकू पट्टा म्हणून ओळखला जातो. दररोज डहाणू येथील लिलाव केंद्रात चिकू खरेदी विक्र ी होत असते. त्यामुळे आदिवासी कामगार, बरोबरच दलाल, वाहतूक तसेच त्यावर अवलंबून असलेल्या हजारो लोकांना रोजचा रोजगार मिळत आहे.उत्पादन वाढल्याने किमती घसरल्यासध्या गुजरात राज्यातील संजाण, वलसाड, अमलसाड, इत्यादी परिसरात दर्जेदार, टिकाऊ व मोठ्या चिकू फळांचे प्रचंड उत्पन्न झाल्याने दररोज तेथून राजस्थान, नागपूर, अजमेर, मुंबई उदयपूर, दिल्ली सारख्या ठिकाणी हजारो टन चिकू जात असल्याने डहाणू, घोलवड परिसरातील लहान चिकू फ ळाला मागणी कमी झाल्याने येथील शेतकरी, बागायतदार हवालदिल झाले आहेत. एकुणच आर्थिक गणित व चढ उताराचा फटका चिकुला बसला आहे.
घोलवड चिकू आर्थिक संकटात;गुजरातमध्ये प्रचंड उत्पादन, बागायतदार अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 2:06 AM