शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
2
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
4
Vinod Tawde: तावडे आलेल्या त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
5
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
6
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
7
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
10
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
11
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
12
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
13
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
14
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
15
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
16
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
17
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
18
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
19
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
20
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?

बोकडचोरांची टोळी गजाआड

By admin | Published: January 26, 2017 2:50 AM

राजस्थान येथून खरेदी केलेले ८ लाख १६ हजार रूपये किमतीच्या बोकडांसह ट्रकमधील ६ लोकांचे अपहरण करणाऱ्या ७ कुख्यात आरोपीना

हितेन नाईक / पालघरराजस्थान येथून खरेदी केलेले ८ लाख १६ हजार रूपये किमतीच्या बोकडांसह ट्रकमधील ६ लोकांचे अपहरण करणाऱ्या ७ कुख्यात आरोपीना अवघ्या ४८ तासांच्या आत स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्यावर अपहरण, दरोडासह मोक्का कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. ही माहिती पोलीस अधिक्षिका शारदा राऊत यांनी दिली.राज्यस्थान येथील ओमप्रकाश खाटीक हे शेतकऱ्यांकडून बोकड खरेदी करून ते मुंबईच्या देवनार भागात विक्र ी करण्याचा व्यवसाय करीत होते. ते आपल्या सहकाऱ्यांसह ८ लाख १६ हजार रुपये किंमतीचे २७२ बोकड एका ट्रकमध्ये भरून विक्री करण्यासाठी मुंबईकडे निघाले असतांना मुंबई- अहमदाबाद महामार्गावरील कासा पोलीस स्टेशनच्या हद्दीत त्यांच्या ट्रकला रस्त्यावर उभ्या असणाऱ्या तरु णांनी हात दाखवून थांबण्यास भाग पाडले. तुमच्या ट्रकमध्ये गायी असल्याचे सांगून पोलीस स्टेशन मध्ये चला असे फर्मावून त्यांचे मोबाईल हिसकावून घेतले. ट्रक मधील ६ लोकांना आपल्या जवळील दोन गाड्यात कोंबून ते सर्व पालघरच्या दिशेने निघाले त्या ६ लोकांना पालघर मधील सेंट जॉन कॉलेज जवळ त्यांनी उतरविले आणि ते चोर पसार झाले. तत्पूर्वी त्या गाडी मागचा ट्रकही गायब झाला होता.आपल्याला लुटण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांशी संपर्क साधला. राऊत यांनी तात्काळ ८ पथकांसह स्थानिकांच्या मदतीने शोध घेतला असता पहाटे तो विक्र मगडमार्गे मनोरकडे येत असतांना पोलीसांचा चुकवून चोरटे जंगलात पसार झाले. त्यांनी कुठलाही पुरावा मागे सोडला नसतांना पोलीस निरीक्षक अशोक होनमाने, सहा.निरी.जितेंद्र ठाकूर, निवास कणसे, सचिन चव्हाण, हवालदार मंगेश चव्हाण, सचिन मर्दे, संदीप सूर्यवंशी, नरेश जनाठे, शंकर वळवी, जनार्दन मते, मनोज मोरे, प्रवीण पाटील यांनी १) रिजवान खान, महापोली, भिवंडी, २)अब्दुल शेख, ३)शेहवाज बागवान, ४) करीम शेख सर्व कल्याण. ५)शफीउल्ला खान, ६)समीर खान, ७)अय्याज सय्यद , वापी (गुजरात) या सात आरोपीना भिवंडी येथून ताब्यात घेतले. आरोपीनी चोरून नेलेल्या २७२ बकऱ्या पैकी १६८ बकऱ्या गणेशपुरी हद्दीतील दळेकर पाडा येथील रांनमाळात लपवून ठेवल्या होत्या. त्या ताब्यात घेऊन पोलिसांनी ह्या सात आरोपी विरोधात अपहरण, दरोडा, हल्ला करणे ई आरोपाखाली गुन्हा दाखल केला. अन्य तीन आरोपी फरार असून त्यांच्या विरोधात मोक्का लावण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत.