- हुसेन मेमनजव्हार : महीला दिनी पालघर जिल्ह्यातील स्वच्छता दुत म्हणून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन्मान झालेल्या तालुक्यातील नांदगाव ( राजेवाडी) येथिल सुशिला खुरकुटे स्वच्छतादुत ठरुनही दुर्लक्षितच राहीली आहे. सन्मानापर्यंतच प्रकाशझोतात राहीलेल्या सुशिला आणि तिच्या कुटुंबाला आता जगण्याचा संघर्ष करावा लागत असून शासनाकडून मुलभूत गरजाही पुरविल्या गेल्या नाहीत हेच आजचे वास्तव आहे.गरोदर असताना सुद्धा स्वच्छता भारत अभियानाचे महत्व लक्षात घेऊन घरी शौचालय असावे या प्रबळ इच्छेने पोटापाण्यासाठी नवरा बाहेरगावी मजुरी करण्यासाठी गेलेला असताना तिने शौचालायाचा खड्डा खणला. ते लक्षात आल्यानंतर तत्कालीन सीईओ निधी चौधरी यांनी तिला जिल्ह्याची स्वच्छता दुत म्हणून सन्मानित केले. पुढे महीला दिनी गुजरात येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तिचा सन्मान करण्यात आला होता.ही सगळी उठाठेव फक्त दाखिवण्यासाठीचीच होती काय असा सवाल आज सुशिलाला भेटल्यानंतर लक्षात सहज पडतो. कारण या गावत असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे पाणी नळाला यायला कधी आठवडा तर कधी १५ दिवसही लागतात. मग दीड किमीच्या आसपास पायपिट करून पाणी आणावे लागत आहे. शौचास लहानगी मुले टाकुन काट्याकुट्यातून जाव लागू नये म्हणून दारापाशी शौचालय बांधलेल्या सुशिलाला पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ही साºया गावाचीच स्थिती असल्याने तिथे सुशिला तरी काय करणार?मात्र, आजही घरची शेती नसल्याने अन्नधान्य हाताशी नाही अशा परीस्थिती मुल लहान असल्याने सुशिलाचा पती हनुमंत याला पोटाची खळगी भरण्यासाठी जिल्ह्याची वेस ृओलांडून ठीकाणी कामाच्या शोधात जावे लागते. दहा ते पंधरा दिवस कुटुंबाला सोडून मोलमजुरी करु न दिवसाला शंभर, दिडशे रूपये कमवून घराकडे यायच अन साठवलेल्या पैशातुन रेशनचे धान्य, तेल, मीठ घ्यायचे. पैसे संपले की, पुन्हा रोजगाराच्या शोधात निघायचं हा नित्यक्रम नसुन रोजगार देणाºया सरकारी यंत्रणेला मारलेली चपराक आहे.सुशिलाची परीस्थिती हलाखीची असुनही मुळ कुटुंबातुन विभक्त झालेल्याना शासनाच्या नियमानुसार पिवळे रेशनकार्ड मिळत नाही. पर्यायाने महीन्याकाठी मिळणारे १२ किलो गहू आणि ८ किलो तांदूळ महागड्या भावाने घेऊन पोटाची भूक भागवावी लागत आहे.आजही तिच्या घरी वीज नसून केरोसीनच्या दिव्यावर आपल्या संसाराचा अंधार दुर करण्याची कसरत करीत आहे. महीन्याला ३ लीटर मिळणारे केरोसीन ज्या दिवशी संपेल त्या दिवशीतर हा मंद प्रकाशही गायब होतो. मग उरतो तो फक्त अंधार अन् त्या अंधारात पंतप्रधानानी सन्मान करताना दिलेली गांधीची प्रतिमाही गुडूप होते. या पेक्षा विदारक म्हणजे महीलाओंको मिला सन्मान अशी जाहिरात बाजी करणाºया शासनाची गॅस वाटप योजना सुशिलाच्या घरी पोहचली नसुन तिला रानावनातील लाकुडफाट्यावरच स्वयंपाक करावा लागत आहे.तर आजघडीला शासनाने दिलेले घरकुल पूर्ण करण्यासाठी सुशिला आणि तिचा परीवार झटत असून यामुळे तिचा संसार उघड्यावर आहे. एकुणच जिल्ह्यातील स्वच्छता दुत ठरलेली सुशीला खुरकुटे हिला आदर्श महीला ठरविताना तिच्या प्राथमिक गरजा, जगण्यासाठीच्या मूलभूत गरजा शासनाकडून उपलब्ध व्हायला हव्या होत्या. तिचा जिल्ह्यातील विविध तालुक्यात स्वछता दुत म्हणुन सन्मान मिळायला हवा होता. मात्र, हे सर्व कागदावरच दिसत आहे.गरोदर अवस्थेत शौचालयासाठी खड्डा खोदणाºया सुशीलाला गोंडस असा मुलगा झाला असून आज सात महिन्यांचा झाला आहे. मात्र, तरीही तिला मातृत्व अनुदान, बुडीत मजुरी अनुदान मिळालेले नाही. यामुळे एकीकडे पंतप्रधानांच्या हस्ते सन्मान करून तिला वाºयावर सोडून द्यायचं, असे धोरण शासनास भूषणार्ह नाही.
स्वच्छतादूत सुशीलाकडे शासनाने फिरवली पाठ, पंतप्रधानांच्या हस्ते झाला होता सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 6:13 AM