शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

गोविंदा अन् राज ठाकरेंमुळे झालेल्या पराभवाने अस्वस्थ, राज्यपाल राम नाईक यांची कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2018 2:47 AM

अभिनेता गोविंदाने केलेला पराभव आणि राज ठाकरेंनी परप्रांतियाला विरोध करण्याचे कारण देत माझ्या समोर मराठी उमेदवार उभा केल्याने झालेला पराभव. हे अस्वस्थ करून गेले, अशी कबुली उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी वसईत बोलताना दिली.

- शशी करपेवसई : अभिनेता गोविंदाने केलेला पराभव आणि राज ठाकरेंनी परप्रांतियाला विरोध करण्याचे कारण देत माझ्या समोर मराठी उमेदवार उभा केल्याने झालेला पराभव. हे अस्वस्थ करून गेले, अशी कबुली उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी वसईत बोलताना दिली.स्व. सुरेश जोशी स्मृती मंच आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वसई शाखेच्या संयुक्त विद्यमाने राम नाईक यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी विचारलेल्या प्रश्नांना राम नाईक यांनी दिलखुलास उत्तरे दिली. रामभाऊंनी वडिलांचे संस्कार, संघाने लावलेली व्यायामाची आवड आणि आलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्याची सवय यामुळे आरोग्य आणि अ़नेक अडचणींचा सामना आयुष्यात करता आल्याचे सांगितले.जनसंपर्क, संघर्ष आणि सेवा ही आपल्या आयुष्याची त्रिसूत्री असून त्यामुळेच आपणाला आतापर्यंत भरभरून यश मिळत गेले. आपण कॅन्सरसारख्या विकारावर आत्मबल, वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती आणि जनतेच्या शुभेच्छा यामुळेच मात करून मृत्यूच्या दारातून परत आल्याची भावना त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केली.कुष्ठरोग्यांना दिलेले अनुदान, अर्नाळा किल्ल्यातील मच्छिमारांना केलेला वीज पुरवठा, मनोरी गोराईला केलेला पाणी पुरवठा यांमुळे सर्वाधिक समाधान लाभल्याचे त्यांनी सांगितले.उत्तरप्रदेशात महाराष्ट्र दिसतो का? या प्रश्नावर त्यांनी कानपूर, अलाहाबाद, आग्रा, वाराणसी या शहरांमध्ये सोने गाळणारे कारागिर हे सांगली, साताºयातील आहेत. उत्तर प्रदेशाच्या राजभवनात महाराष्ट्र दिन साजरा करण्याची प्रथा आपण सुरु केली आहे. शिवनेरी ते शिवजयंती असा मोटार सायकलने प्रवास करून आलेल्या मावळ््यांनी लखनऊ भगवेमय केले. त्यामुळे निश्चित उत्तर प्रदेशातही महाराष्ट्र दिसून आला, असे त्यांनी सांगितले.उत्तर प्रदेशात वीज, कायदा आणि सुव्यवस्था, उद्योगधंदे, व्यापार, नोकºया या समस्या आहेत. काम नसल्यामुळे लोक मुंबईतील झोपड्यांमध्ये दाटीवाटीने रहात आहेत. मात्र, त्यांच्या रोजगारासाठी उत्तर प्रदेशात गुंतवणूकदारांची बैठक घेण्यात आली. त्यात १ हजार ८५ गुंतवणूकदारांनी ४.२८ लाख कोटी रुपये गुंतवण्याची तयारी दाखवली. त्यामुळे ४० लाख लोकांना रोजगार उपलब्ध होईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.मुलाखतीपूर्वी भाजपाचे सरचिटणीस राजन नाईक यांनी रामभाऊंनी उत्तर प्रदेशचा उत्तम प्रदेश केला असे गौरवोद्गार काढले. जातीपातीच्या पलिकडे माणसाचा शोध घेणारे रामभाऊंचे व्यक्तीमत्व असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कोमसापचे वसई शाखाध्यक्ष अनिल रोकडे यांनी स्वागत केले. हरेश्वर नाईक यांनी त्यांच्या कार्याचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन मनोज पाटील यांनी तर आभार शेखर धुरी यांनी मानले. या दिलखुलास मुलाखतीमुळे अनेकांना अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली.

टॅग्स :Ram Naikराम नाईकVasai Virarवसई विरार