मोखाडा : दिवाळी सरताच तालुक्यातील शेतकऱ्यांचे धान्य खळ्यांतून घरी येऊ लागले आहे. या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास महामंडळाने आधारभूत धान्यखरेदी सुरू केली आहे. मध्यवर्ती ठिकाण असलेल्या खोडाळा, मोखाडा आणि मोरचोंडी येथील आधारभूत धान्य केंद्रांचे उद्घाटन विक्रमगड विधानसभेचे आमदार आदिवासी विकास महामंडळाचे संचालक सुनील भुसारा यांच्या हस्ते करण्यात आले.
आ. भुसारा यांनी महाविकास आघाडी सरकार आदिवासी शेतमजूर, शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तत्पर असून शेतकऱ्यांच्या धान्याला योग्य आणि हमीभाव मिळावा, शेतकऱ्यांची पिळवणूक होऊ नये म्हणून आधारभूत धान्य केंद्र तातडीने सुरू असल्याचे सांगितले. यावेळी मोखाडा पंचायत समितीच्या उपसभापती लक्ष्मी भुसारा, सदस्य प्रदीप वाघ, आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक व्ही.एस. गांगुर्डे, उपप्रादेशिक व्यवस्थापक ए.व्ही. वसावे, आदी उपस्थित हाेते.
भाताला एक हजार ८८८ रुपयांचा हमीभावमहामंडळाची एकाधिकार धान्यखरेदी योजना ही सुरू करण्याचा सरकारचा मानस असून लवकरच त्याचा निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. सध्या भाताला एक हजार ८८८ तर नागली (नाचणी) ला तीन हजार २९५ रुपये क्विंटल हा भाव निश्चित केला आहे.