- रवींद्र साळवेमोखाडा : जव्हार प्रकल्प कार्यालयांतर्गत कार्यरत आश्रमशाळा नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणावरून वादात सापडलेल्या असतात. आता येथे लाखो रुपयांचा धान्य घोटाळा उजेडात आला आहे.प्रकल्पा अंतर्गत ३० आश्रमशाळा चालवल्या जातात. जून महिन्यात सेंट्रल किचन योजना सुरू होणार असल्याने मार्च-एप्रिल महिन्यात अतिरिक्त धान्य साठा खरेदी केला जाऊ नये, याबाबतचे आदेश तत्कालीन प्रकल्प अधिकारी अजित कुंभार यांनी संबंधित आश्रमशाळांना दिले होते. असे असूनही आश्रमशाळा अधीक्षकांनी ठेकेदाराला हताशी धरून चास, हिरवे गोंदे, पळंसुडा, ऐना, साकुर, न्याहळे, झाप, नांदगाव, देहरे, दाभोसा, दाभेरी, विनवळ, देहरे, वांगणी, कुरझे, भोपोली, कष्टे साखरे, मुरबाऊ, कावळे, गुहिर, पाली, गुंज, गारगाव, आमगाव, कळंभे, या आश्रमशाळा अधीक्षकांकडून अतिरिक्त धान्यसाठा खरेदी केला गेला. यामध्ये हिरवे आणि न्याहाळे येथे सर्वाधिक धान्य साठा आहे.आता सेंट्रल किचन योजना सुरू झाल्याने लाखो रुपयांचा हा धान्य साठा पडून आहे. सध्या उंदीर - घुशींमुळे याची नासधूस सुरू आहे. चौकशीच्या फेऱ्यातून स्वत:ला वाचवण्यासाठी तांदूळ, गहू, तेल, डाळ, शेंगदाणे असे विविध साहित्य पावसाळ्यात खराब झाल्याचे दाखवून आश्रमशाळा अधीक्षकांनी पंचनामे केले आहेत. यामुळे या अधीक्षकांसह ठेकेदारावर कठोर कारवाईची मागणी होत आहे. अधीक्षकाकडून किरकोळ धान्य साठा असल्याचे सांगितले जात असले तरी येथे १८ क्विंटल तांदूळ, १४ क्विंटल तूरडाळ, कडधान्य असे विविध साहित्य असल्याचे तेथील कर्मचाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला सांगितले.आम्ही पंचनामा केला आहे आणि ४ क्विंटल धान्य शिलक असल्याचे त्यांनी सांगितले. हे धान्य तुम्हाला बघता येणार नाही आणि फोटो देखील काढता येणार नाही. फोटोसाठी प्रकल्प अधिकाºयांची परवानगी लागेल. - राजू बिळअंगळी,अधीक्षक, हिरवे आश्रमशाळामी आताच आलो आहे. चौकशी करून पुढील कार्यवाही केली जाईल.- सौरभ कटीयार,प्रभारी प्रकल्प अधिकारी, प्रकल्प कार्यालय जव्हार
जव्हार प्रकल्पातील आश्रमशाळेत धान्य घोटाळा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 1:31 AM