शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
5
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
6
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
7
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
8
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
9
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
10
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
11
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
13
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
14
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
15
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
16
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
17
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
18
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
19
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
20
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका

ग्रामदान मंडळांना ग्रा.पं.चा दर्जा द्या

By admin | Published: July 30, 2015 10:49 PM

विक्रमगड तालुक्यात माण, वाकी तसेच नागझारी व ठिकाणी ग्रामपंचायती ऐवजी ग्रामदान मंडळे आहेत. ग्रामपांयतीला मिळणारा निधी व ग्रामदानास मिळणाऱ्या निधीमध्ये भिन्नता आहे.

तलवाडा : विक्रमगड तालुक्यात माण, वाकी तसेच नागझारी व ठिकाणी ग्रामपंचायती ऐवजी ग्रामदान मंडळे आहेत. ग्रामपांयतीला मिळणारा निधी व ग्रामदानास मिळणाऱ्या निधीमध्ये भिन्नता आहे. त्यामुळे गावाच्या, खेडयाच्या व शहराच्या विकासाच्या दृष्टीेन ग्रामदान मंडळांना ग्रामपंचायतीप्रमाणेच दर्जा दिला जावा असल्याची मागणी मंडळातील रहीवाशांनी केली आहे.विक्रमगड तालुक्यामध्ये एकुण ३९ ग्रामपंचायती व तीन ग्रामदान मंडळांचा समावेश आहे. त्यामध्ये वाकी, माण व नागझरी या ठिकाणी ग्रामपंचायती एवजी पूर्वापार ग्रामदान मंडळामार्फत कारभार चालविला जातो. जरी या ग्रामदान मंडळात ग्रामपंचायतीप्रमाणे ग्रामसेवकाचे कामकाज चालत असले तरी इतर व्यवहार हा वेगळया पध्दतीत असतो. ग्रामपंचायतीला येणारा निधी ग्रामदान मंडळाला नसतो त्यामुळे ग्रामदान मंडळाची रचना व ग्रामपंचायतीची रचना वेगळी वेगळी आहे. ग्रामदान मंडळात अध्यक्ष कारभार पाहतो तर ग्रामपंचायतीचा सरपंच. ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक गुप्त मतदान पध्दतीने होते तर ग्रामदान मंडळाची गावातील लोक कार्यालयात एकत्र येऊन अध्यक्ष पदाकरिता उभे असलेल्या उमेदवारांस हात वर करून खुल्या मतदानाने निवडून देतात. असा वेगळा वेगळा कारभार ग्रामदान मंडळाचा व ग्रामपंचायतीचा आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या मानाने ग्रामदान मंडळाची विकास कामे त्या गतीने होत नाहीत. (वार्ताहर)