शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

ग्रामसेवक आंदोलनाने कामे ठप्प; दखल नाही, आंदोलकांची झाली गोची, जनता धरली गेली वेठीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2018 5:36 AM

पालघर जिल्हा परीषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी टी. ओ. चव्हाण यांची बदली झाल्यानंतर त्या जागी २० आॅगस्ट रोजी हजर झालेल्या अशोक पाटील यांच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक सामूहिक रजेवर गेले आहेत.

मोखाडा : पालघर जिल्हा परीषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी टी. ओ. चव्हाण यांची बदली झाल्यानंतर त्या जागी २० आॅगस्ट रोजी हजर झालेल्या अशोक पाटील यांच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक सामूहिक रजेवर गेले आहेत. मात्र या आंदोलनाला मंगळवारी दिवस होवूनही कोणताही तोडगा न निघाल्याने सर्व कामकाज ठप्प झाले असून जनता वेठीस धरली गेली आहे. पाटील यांना राजकीय पाठबळ मिळत असल्याने ग्रामसेवकांच्या या आंदोलनाची कोणतीही दखल घेतली जात नसल्याने आंदोलनकर्त्यांची कोंडी झाली आहे.पाटील हे वादग्रस्त अधिकारी असून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत याशिवाय ग्रामसेवकाची आर्थिक पिळवणूक करणे, दौरे करत असताना पैसे जमा करणे असे आरोप पालघर जिल्हा ग्रामसेवक संघटनेने केले असून तसे पत्र ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना दिले आहे मात्र यानंतरही कसलीच कार्यवाही यावर न झाल्याने गेल्या १५ दिवसांपासून ग्रामसेवक ग्रामसेवक सामूहिक रजेवर गेले असल्याने जिल्हाभरातील कामे रखडली आहेत. मात्र असे असतांनाही यावर तोडगा काढण्यासाठी कोणीही प्रयत्नशील नाही. उलटपक्षी ठाणे जिल्ह्यातील आणि काही पालघर जिल्ह्यातीलही पदाधिकारी पाटील यांच्या पाठीशी उभे राहत असल्याचे दिसून येत आहे.ग्रामसेवकांच्या आंदोलनाविरोधात श्रमजीवीचे धरणेवाडा : तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक गेल्या कित्येक दिवसांपासून सामुदायिक रजेवर गेल्यामुळे ग्रामपंचायतींचे प्रशासन ठप्प झाल्याने जनतेच्या कामांचा खोळंबा झाला आहे. या विरोधात श्रमजीवी संघटनेने आक्र मक पवित्रा घेतला असून या सर्व ग्रामसेवकांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज पंचायत समितीच्या आवारात धरणे धरले.पालघर जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी अशोक पाटील यांच्या झालेल्या नियुक्ती विरोधात जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक बेमुदत सामुदायिक रजेवर गेले आहेत. पाटील हे आपल्या पदाचा गैरवापर करून ग्रामसेवकांना वेठीस धरत असल्याचे कारण सांगून ग्रामसेवकांनी संपाचा पवित्रा घेतला आहे.तर ग्रामसेवकांच्या सामुदायिक रजेमुळे मुलांच्या शैक्षणिक दाखल्यांपासून ते गोरगरीब जनतेच्या अनेक कामांचा खेळखंडोबा झाल्याने श्रमजीवीने हा मुद्दा उचलून मंगळवारी पंचायत समितीच्या आवारात धरणे धरले. याबाबतचे निवेदन गटविकास अधिकारी राजलक्ष्मी येरपुडे यांना देवून लेखी आश्वासनानंतर आंदोलनमागे घेण्यात आले.या आंदोलनाचे नेतृत्व श्रमजीवी संघटनेचे जनरल सेक्र ेटरी विजय जाधव यांनी केले तर आंदोलनात तालुका अध्यक्ष जानूभाउ मोहनकर, तालुका सचिव सरिता जाधव, मनोज काशिद, कामगार संघटना अध्यक्ष रवींद्र चौधरी, शेतकरी घटक प्रमुख किशोर मढवी, उपाध्यक्ष सुरेश पराड, संघटक बाळाराम पाडोसा आदींसह शेकडोंच्या संख्येने श्रमजीवी उपस्थित होते.विक्रमगड पं.स.समोर श्रमजीवीचा ठिय्याविक्रमगड : ग्रामस्तारावरून विकासाचे काम करणारी यंत्रणा म्हणजे ग्रामपंचायत परंतु या तालुक्यातील ग्रामसेवकच गेल्या २१ तारखेपासून बेमुदत रजेवर गेल्यामुळे तालुक्यातील ग्रामपंचायतीचा विकास खुंटला आहे. या बेमुदत रजेमुळे अनेक विकास कामे खोळबली असून विद्यार्थ्यांना ही शैक्षणिक दाखल्यासाठी वाट पहावी लागत आहे असा आरोप श्रमजिवीचे जिल्हा सरचिटणीस कैलास तुबडा यांनी केला आहे.तसेच आबिवली ग्रामसेवकवर कारवाई कधी करणार, महाराष्ट्र रोजगार हमी अंतर्गत टेटवाळी व सावरोली या ठिकाणी रस्ताच्या कामात मजूराना २१ रु पये ते २९ रु पयापर्यत रोजगार मिळाला असून मजूराची फसवणुक केली आहे यांना नियमा प्रमाणे मजुरी द्या या मागण्यांसाठी मंगळवारी विकमगड पंचायत समिती समोर श्रमजिवी संघटनेतर्फे ठिय्या आदोलन करण्यात आले.या मागण्या मान्य होत नाहीत. वरिष्ठ अधिकारी येणार नाहीत तोपर्यत हे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा श्रमजिवी संघटनेने दिला. या आंदोलनात शंकर भोये, लक्ष्मण पडवळे, रूपेश डोले, कासट ताई, व इतर असंख्य कार्यकर्ते उपस्थितहोते.

 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार