वसई : नोटबंदी, जीएसटी यामुळे बंद पडलेले उद्योग व्यवसाय , वाढलेली बेरोजगारी परिणामी देशाची ढासळलेली आर्थिक स्थिती याचा प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष फटका पालघर तालुक्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या लघू उद्योकाना बसला. त्यातच विकासाच्या नावाने मारलेली खोटी बोंब यामुळे केवळ पालघरच मतदारसंघातच नाही तर संपूर्ण देशात मोदी सरकार विरोधात प्रचंड नाराजी पसरलेली आहे. याचाच फायदा बहुजन विकास आघाडीचे रिक्षातून फिरणारे उमेदार बळीराम जाधव याना होणार आहे.शहरीकरणाच्या अपेक्षेत असलेल्या या पालघर मतदारसंघाचे नेतृत्व गेली अनेक वर्षे भाजपचे राम नाईक यांच्याकडे होते. तेंव्हा हा मतदारसंघ मुंबईतील गोरेगाव पासुन डहाणू परंत पसरलेला होता. पण निवडून येणाऱ्या खासदारानी फक्त मुंबईचा विकास केला. पण पालघर कडे लक्षच दिलं नाही. परिणामी मतदारसंघ एकच असुनही पालघर, डहाणू आणि वसई तालुके विकासापासून दूर राहिले.येथील ग्रामीण भागासाठी कोणतीही ठोस योजना भाजपचे राम नाईक यानी आणली नाही. उपनगरी रेल्वे सारखा प्रश्नही ते रेल्वे मंत्री असूनही सोडवू शकले नाही. डहाणू -शिर्डी रेल्वे मार्ग टाकणार असेही नाईक यानी सांगितले यासाठी त्याकाळी सर्व्हेसाठी कोट्यवधी रु पये खर्च केले पण पुढे या मार्गाचे काहीच झाले नाही. यामुळेच २००९ साली उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघाची विभागणी होऊन पालघर मतदारसंघ निर्माण झाला. आणि पालघरच्या विकासाला खºया अर्थाने सुरु वात झाली त्यामुळे स्थानिकांना आपला उमेदवार निवडण्याची संधी मिळाली.मुंबईच्या उंबरठ्यावर असलेला हा पालघर मतदारसंघ. यामुळे शहरीकरणाची आस लाऊन बसलेला हा मतदारसंग. डहाणू, विक्र मगड, पालघर, बोईसर, नालासोपारा आणि वसई या विधानसभा मतदारसंघात पसरलेला हा पालघर लोकसभा मतदारसंघ. येथील बहुतांश तरु ण नोकरी- व्यवसाय निमित्त नेहमीच मुंबईत येत जात असतात. यामुळे पालघरमध्ये सुविधा मिळाव्यात या अपेक्षेत येथील जनता विशेषता येथील तरु ण वर्ग आहे. पण विकासाची स्वप्न पहाता पहाता एक पिढी काळाच्या पडद्याआड गेली. याचे मुख्य कारण खासदारांचे दुर्लक्ष २००९ च्या लोकसभा निवडणुकीत वसईचे आमदार आणि बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकुर यानी वसईत केलेल्या विकास कामाच्या आधारेच पालघरवासियांनी बळीराम ठाकुर यांना कौल दिला होता.२०१४ च्या लोकसभा निवडणुकी नंतर सेना भाजपामध्ये वाद होऊन दोन्ही पक्ष समोरासमोर उभी ठाकली. या काळात त्यांनी एकमेकांची उणी धुणी काढली. एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोपही केले. हे सर्व सूरु असतानाच पालघर लोकसभा मतदारसंघतील भाजपाचे खासदार चिंतामण वनगा यांचे निधन झाले. त्यानंतरची पोट निवडणुक सर्वांनाच ठावुक आहे. त्यात गावितांना निसटता विजय मिळाला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी युती होणार नाही असे सांगुन स्वबळाची भाषा सुरु केली होती. मात्र त्यांच्या अवसान घाती राजकारणामुळे शिवसैनिक दुखावले असून भाजपमधुन गवित यांना शिवसेनेने पक्षात प्रवेश देऊन त्याना उमेदवारी दिल्याने शिवसेनेत प्रचंड नाराजी आहे.कामाच्या बाबतीत बळीराम जाधव गावितांना उजवेराजेंद्र गवित आणि बळीराम जाधव या दोघांमधील कामांचा अवाका पहिल्यास बळीराम जाधव हे नक्कीच उजवे ठरत आहे व ठरतील कारण जाधव यांच्या मागे हितेंद्र ठाकुर या नावाच्या विकासाची ताकत आहे. आणि पालघर वासियांना विकासाची गरज आहे. मागिल पाच वर्षात येथील विकास ठप्प झाला आहे. जनतेच्या जीवनाशी निगडीत असलेला आरोग्या चा प्रश्न आ वासून उभा आहे. नोटबंदी मुळे आधीच सामन्य जनता बेजार झाली आहे. पालघर तालुका हे लघुद्योगचे केंद्र आहे. हे सारे उद्योग डबगाईला गेले आहेत. यामुळे मोदी सरकारच्या विरोधात कामगारात, सामान्य माणसामधे प्रचंड संताप आहे. हा संताप मतदार निवडणुकांमध्ये बाहेर काढेल असे चित्र दिसत आहे.
जीएसटी, नोटबंदी, बेरोजगारीचा फटका गावितांना बसणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 11:24 PM