शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
2
'१० कोटी दे नाहीतर तुला वडिलांसारखे मारून टाकीन'; झीशान सिद्दीकी यांना डी कंपनीकडून धमकी
3
अभिनेता टायगर श्रॉफच्या हत्येसाठी २ लाखाची सुपारी दिल्याचा दावा; एकावर गुन्हा दाखल
4
ट्रम्प टॅरिफचा फटका अमेरिकन कंपनीलाच? अ‍ॅपलनंतर गुगलने घेतला मोठा निर्णय
5
रोहित पवारांना आणखी एक धक्का: नगरपालिका हातातून निसटली; कर्जतचा नवा नगराध्यक्ष कोण?
6
रियल इस्टेटचा 'खिलाडी' बनला अक्षय कुमार, २ अपार्टमेंटमधून केलेली बंपर कमाई; आता कोणाला कोट्यवधींना विकलं ऑफिस?
7
"हे आज धर्म, जात शिकवायला आलेत", 'फॅण्ड्री'मधल्या शालूने ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर
8
कोण होणार ख्रिस्ती धर्मीयांचा पुढचा पोप? ही पाच नावं शर्यतीत आघाडीवर
9
'चित्रपटगृह मिळालं नाही की, राज ठाकरेंकडे येणारे मराठी कलाकार का गप्प आहेत?', संदीप देशपांडेंनी दिला इशारा
10
मराठी अभिनेत्रीवर दु:खाचा डोंगर; शुभांगी अत्रेच्या Ex पतीचं निधन, अडीच महिन्यांपूर्वीच झालेला घटस्फोट
11
RBI नं १० वर्षांच्या वरील मुलांसाठी बँक अकाऊंटचे नियम बदलले, खातं उघडण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाची माहिती
12
ट्रम्प आणि हार्वर्ड विद्यापीठातील संघर्ष शिगेला! विद्यापीठाने ट्रम्प प्रशासनावरच भरला खटला; वाद काय?
13
भाजपाला शह देण्याची एकनाथ शिंदेंची रणनीती; नवी मुंबईतले १२ माजी नगरसेवक शिंदेसेनेत येणार
14
ज्येष्ठांसाठी बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
15
ऑर्लँडो विमानतळावर डेल्टा विमानाला आग, आपत्कालीन स्लाइड्स वापरून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले
16
वाल्मीक जेलमध्ये, तरीही कार्यकर्त्यांची दहशत सुरूच; बीडचे DYSP गोल्डे यांच्या जबाबाने खळबळ
17
तुमच्याकडे ५०० रुपयांची नोट खरी आहे की खोटी? गृह मंत्रालयाने इशारा दिला
18
बापरे! भारतात नव्हे तर जगात चंद्रपूर शहर ठरले सर्वात उष्ण; एप्रिलमध्येच पारा ४५.६ अंश
19
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ एप्रिल २०२५: कोणत्याही कामात यश मिळेल, आर्थिक फायदा होईल
20
अधिकारांत हस्तक्षेप करीत असल्याचे आमच्यावर आरोप; न्या. भूषण गवई यांनी नोंदवले निरीक्षण

विद्यार्थ्यांना दिले लैंगिक शिक्षणाचे मार्गदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2019 01:18 IST

संगीता दारव्हेकर ट्रस्टचा सीमा भागात उपक्र म : व्यक्तिमत्व विकासाचाही समावेश

अनिरुद्ध पाटील 

डहाणू/बोर्डी : सीमा भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे देतानाच आदिवासी विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षण देऊन जागरूक करण्यासह शोषणाविरुद्ध सजग करण्याचे कार्य संगीता दारव्हेकर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे हाती घेतले आहे. बोर्डीचे सुपेह विद्यालय आणि बोरीगावच्या व.का. लाखाणी हायस्कूल येथे यासंबंधी नुकतेच कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या आदिवासी पट्ट्यातील विद्यार्थी प्रतिभावंत आहेत. मात्र स्वत:ला व्यक्त करण्यात ते कमी पडत असल्याने मोठ्या संधीपासून मागे राहतात. त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी तसेच यश मिळविण्यात होणाऱ्या सकारात्मक बदलाची माहिती व्यक्तिमत्त्व विकासाच्या व्याख्यानाद्वारे विद्यार्थ्यांना देण्यात आली. सेक्स या शब्दाने विद्यार्थ्यांच्या भावविश्वावर येणारे दडपण आणि अव्यक्त झाल्यामुळे होणारा भावनिक कोंडमारा या विषयीचे मार्गदर्शन ‘वयात येताना’ व्याख्यानातून करण्यात आले. यावेळी पौगंडावस्थेतील मुलामुलींच्या शारीरिक आणि मानसिक बदलाविषयी माहिती दिली. दरम्यान, या उत्सुकतेपोटी चुकीची आणि अर्धसत्य माहिती मिळाल्याने होणारे गैरसमज याबद्दल सजगता निर्माण करताना विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि शिक्षकांसाठी वेगवेगळे सेशन घेण्यात आले तर लैंगिक शोषणाविरुद्ध सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी पोस्को कायद्यातील तरतुदी, अधिकार तसेच शिक्षा याबद्दल समजाविण्यात आले.या तज्ज्ञांनी दिली माहितीआत्मविश्वास आणि यश याविषयी व्याख्याते श्याम वारीयर यांनी तर विद्यार्थिनींना लैंगिक शिक्षणाविषयी स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. अरुणा सदरंगानी, डॉ. स्मिता मूर्ती आणि विद्यार्थ्यांना हितेन वाडिवाला, राजेश सदरंगानी, डॉ.सुहास दारव्हेकर यांनी मार्गदर्शन करून, त्यांच्या शंकांचे निरसन केले.‘सेक्स या विषयाबद्दलच्या जिज्ञासेने चुकीची माहिती मिळाल्याने काही विद्यार्थी याला बळी पडतात. तर ८ वी ते १० वी मधील विद्यार्थिनींना गर्भधारणा झाल्याची अनेक उदाहरणे आदिवासी भागात घडतात. त्यामुळे शाळा सोडावी लागते. हे घडू नये हे या उपक्र माचे प्रयोजन आहे.’- डॉ. सुहास दारव्हेकर (संस्थापक, संगीता दारव्हेकर चॅरिटेबल ट्रस्ट)

टॅग्स :Vasai Virarवसई विरारSex Changeलिंगपरिवर्तनEducationशिक्षण