शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

गुरुनाथ नाईकांना घर मिळणार; सरकारने न दिल्यास शिवसेना देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 11:38 PM

मंत्री एकनाथ शिंदे, आ. फाटक यांची धाव

वसई : ज्येष्ठ कादंबरीकार गुरु नाथ नाईक (७९) यांना वृद्धापकाळात हक्काच्या घरासाठी वणवण भटकावे लागतआहे. गेली चाळीस वर्ष आपल्या रहस्यमय कथा आणि कांदबरीने आपल्या मोठ्या चाहत्या वर्गाला खिळवून ठेवणाऱ्या या अवलियाची या उतारवयात आर्थिक चणचण होतं आहे. मुलीच लग्न झालं तर मुलाला नोकरीच नाही. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर परीकर यांनी त्यांना औषधोपचारासाठी एक घर दोन वर्षासाठी दिलं होतं. मात्र आता तेथे त्यांना सहा वर्ष झाली आहेत. ते घर ही मे २०१९ पर्यंत खाली करावं लागणार आहे. त्यामुळे स्वत:च्या घरासाठी नाईक आपल्या पत्नीसह महाराष्ट्रभर फिरत आहेत. याप्रकरणी राज्य सरकारने न दिल्यास शिवसेना नाईक यांना हक्काचा निवारा देईल असे मंत्री एकनाथ शिंदे व आमदार रविंद्र फाटक यांनी सांगितले.

गेली चाळीस वर्ष गुरु नाथ नाईक यांनी आपल्या लेखनीतून १,२०८ रहस्यमय कथा आणि कादंबरी लिहिल्या. त्यांची ‘पात्रे’ अनेकांच्या स्मरणात राहिली आहेत. ‘गरु ड’ मधील मेजर अविनाश भोसले, ‘धुरंधर’ मधील धुरंधर सामंत, ‘शिलेदार’ मधील कॅप्टन दिप या व्यक्तीरेखा अजूनही वाचकांच्या मनात घर करून बसली आहेत. त्यांची पहिली कथा ‘मृत्यूकडे नेणारे चुंबन’ आणि दुसरी रहस्यकथा ‘शास्त्रज्ञाच्या मृत्यूचे गूढ’ ही आहे. महिन्याकाठी ते ७ - ८ कादंबºया ते सहज लिहित. प्रत्येक कादंबरीच्या चार ते पाच हजार प्रति खपत. मात्र, या अवलीयाने साहित्यात भर घालताना, आपल्या घर प्रपंचाकडे कधीच आर्थिक निकषातून बघितलं नाही. त्यामुळेच आज गलोगली फिरण्याची वेळी या लेखकावर आली आहे. नाईक यांच्या घराण्याला स्वातंत्र्यलढ्याचीही पाशर््वभूमी आहे.

गोव्याच्या साखळीचे हे नाईक त्यावेळचे राणे, या घराण्याने पोर्तुगीजांविरु द्ध १७ बंडे पुकारली होती. नाईक यांचे आजोबा लेफ्टनंट होते. गेल्या २० वर्षापासून ते आजाराने ग्रस्त आहेत. औषधोउपचारासाठी गोव्याचे तत्कालीन मुख्यमंञी मनोहर परिरकर यांनी गुरु नाथांना सरकारी कॉटेज राहण्यासाठी दिलं होतं. ते ही दोन वर्षासाठी आता त्याला सहा वर्ष झाली आहेत. त्यामुळे त्यांना आता लाज वाटत आहे. गुरु नाथ नाईक हे १९८० ते १९८९ पर्यंत वसईत रहात होते. त्यामुळे येथे त्यांचे काही परिचयाचे लोकं आहेत. आपल्या हक्काच्या घरासाठी गुरूनाथ नाईक वसईत आले आहेत.त्यांचे आजारपण, मुलाला नोकरी नाही अन् ३,२०० रुपये मानधनगुरु नाथ नाईक तसेच त्यांच्या पत्नी गीता नाईक यांना मेहनत करु न आपलं उर्वरीत जीवन जगायचं आहे. त्यासाठी मिळेल ते काम करायला ते तयार आहेत. मात्र, चार भिंतीच घर नसेल तर काय करणार या उतारवयात. गोव्याला रहाताना गीता नाईक या स्वत: नोकरी करायच्या आणि घर खर्च चालवायच्या. गोवा सरकारच्या कला संस्कृती विभागातून महिन्याला ३,२०० रु पये एवढं मानधन ही त्यांना मिळतं. मात्र, पाचवीला पुजलेल्या या आजारपणात फार खर्च व्हायचा. मुलानं नोकरी करु न, स्वत:च शिक्षण पूर्ण केलं. मात्र त्याला ही नोकरी नाही आर्थिक विवंचनेत रात्रीचा डोळा लागत नाही अशी विवंचना गीता नाईक यांनी लोकमतकडे मांडली.शिवसेना मदतीसाठी धावलीआयुष्याच्या संध्याकाळी हक्काच्या घरासाठी चाललेली त्यांची वणवण पाहून शिवसेनेने त्यांना मदतीचा हात दिला आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे व पालघर संपर्कप्रमूख रविंद्र पाठक यांनी नाईक यांना लवकरच सरकारकडून घर मिळवून देऊ अशी ग्वाही दिली आहे.रविवारी पालघर जिल्हा प्रमूख वसंत चव्हाण, तालुकाप्रमुख प्रविण म्हाप्रळकर व विधानसभासंघटक विनायक निकम यांनी गुरूनाथ नाईक व त्यांची पत्नी गिता नाईक यांची वसईत भेट घेतली होती. याबाबत शिवसेना नेते एकनाथ शिंदे व संपर्क प्रमूख रविंद्र पाठक यांनी जर सरकारकडून दुर्लक्ष झाले तर शिवसेना जबाबदारी घेईल अशी ग्वाही दिली असल्याचे सांगितले.विनायक निकम यांनी त्यांची वसईत एका लॉजवर राहण्याची व्यवस्था केली होती. सोमवारी सकाळी गुरूनाथ नाईक पत्नीसह पुन्हा गोव्याला गेले असून ते पुढील आठवड्यात पुन्हा वसईत येणार आहेत.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे