हुसेन मेमन
जव्हारमध्ये गुरुवार दि. 18 फेब्रुवारी रोजी दुपारी चारच्या सुमारास अवकाळी पावसाला सुरवात झाली आहे, दुपारपासून शहरात आभुट वातावरण निर्माण झाले होते, थंडगार वारा सुरू होऊन गारांचा पाऊस सुरू झाला होता, 45 मिनिटे पडलेल्या तुफान पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.
सकाळ पासून जव्हार शहरात आभूट वातावरण झाले होते, दुपार नंतर गार वारा सुरू झाला, आणि 4 वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पावसाने जोरदार सुरुवात केली, जवळपास 45 मिनीट पाऊस धो धो बरसला त्यात काही वेळ गारांचाही मारा झाला, दरम्यान सर्वत्र जलमय परिस्थिती झाली होती.
मात्र या वादळी वाऱ्याच्या पावसाने आंबा बागायती व काजू बागायतींना फटका लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे, शेतकरी चिंतेत सापडला असून, आंब्याला आलेला मोहोर मोठ्याप्रमाणात गळला असून, याचा परिणाम येणाऱ्या आंबा काजू पिकांवर होण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.