शशी करपे/लोकमत न्यूज नेटवर्कवसई : वसई विरार महापालिकेने केलेल्या नालेसफाईत प्रचंड आर्थिक घोटाळा झाला आहे. एका बंदीस्त नाल्याची पोकलेन आणि जेसीबी मशीनने सफाई केल्याची माहिती महापालिकेच्याच अधिकाऱ्याने माहिती अधिकारात दिली आहे. तर सफाई कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी बायोमेट्रीक मशीन काही ठेकेदारांच्याच कार्यालयात लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उजडोत आला आहे. वसई क्षेत्रातील उमेळा फाटक ते नायगाव खाडी, परुळेकर स्कूल शेजारील नाला. डी मार्ट नाला, नायगाव जेट्टी, पाचूबंदर डंम्पिंग ग्राऊंड, बेणेपट्टी कँसर हॉस्पीटल नाला, खारपाडा नाला, नरोना मार्ग नाला, सुुरुची बाग उघाडी, गिरीज विरंगुळा केंद्र नाला व टोकपाडा नाला या बारा नाल्यांची जेसीबी व पोकलेन मशीनने सफाई करण्यात आल्याचे महापालिकेने म्हटले आहे. मात्र, यातील बहुतांश नाल्यांची पुन्हा मनुष्यबळाचा वापर करून सफाई करण्यात आल्याची माहिती अधिकृतपणे देण्यात आली आहे. तर बहुतांश ठिकाणी केवळ कागदोपत्री सफाई झाली असून मोठ्या प्रमाणात हातसफाई केली गेल्याचा आरोप घुटूकडे यांनी केला आहे. या ठेक्यात काही अधिकारी आणि सत्ताधारी बहुजन विकास आघाडीतील काही नगरसेवकांची भागिदारी आहे. त्यामुळे कमी मनुष्यबळ पुरवून ज्यादा मनुष्यबळ पुरवल्याचे दाखवून महापालिकेची तिजोरी लुटण्याचा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. त्यामुळे आयुक्त सतीश लोखंडे यांनी दोन हजार कंत्राटी कामगारांना घरी बसवले होते. तसेच यावर उपाय म्हणून महापालिकेने कंत्राटी कामगारांनाही बायोमेट्रीक हजेरी बंधनकारक केली आहे. मात्र, यातही आता मोठा घोटाळा होत असून काही ठेकेदारांनी बायोमेट्र्ीक मशीन स्वत:च्याच कार्यालयात बसवली असून त्याठिकाणी बोगस कर्मचाऱ्यांमार्फत हजेरी दाखवली जात असल्याची माहिती लोकमतच्या हाती लागली आहे. कंत्राटी कामगारांच्या हजेरीसाठी बायोमेट्रीक मशीन्स संबंधित प्रभाग समिती कार्यालयात बसवण्यात यावीत अशी मागणी करण्यात येत आहे. आता याबाबत आयुक्त काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांची भागिदारीपावसाळी नालेसफाईच्या कामात हातसफाई होत असून त्यात काही लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांची भागिदारी लपून राहिलेली नाही. प्रत्यक्षात नालेसफाईत हातसफाई कशी होते ही बाब महापालिकेच्या अधिकाऱ्याने कागदोपत्री उघड केली आहे.आय प्रभागातील सिमेंट क्राँकीट व स्लॅबने बंदिस्त असलेल्या नाल्याची जेसीबी आणि पोकलेन मशीनने सफाई केल्याची माहिती भाजपाचे वसई शहर अध्यक्ष मारुती घुटुकडे यांना माहिती अधिकारात मागवलेल्या माहितीत देण्यात आली आहे. त्यामुळेच ही सफाई संशयास्पद ठरली आहे.
नालेसफाईत सुरु आहे ‘हातसफाई’
By admin | Published: July 07, 2017 6:03 AM