- रविंद्र साळवे, मोखाडापालघर जिल्ह्यातील जव्हार मोखाडा विक्र मगड वाडा येथील आदिवासी समाज हा सध्या लग्न सोहळ्यांसाठी काढव्या लागत असलेल्या कर्जांच्या विळख्यात सापडतो आहे. या समाजाचा प्रामुख्याने शेती हाच व्यवसाय आहे. त्यातून मिळणारे उत्पन्न अल्प त्यातच शेतमालाचे भाव कोसळलेले. नोटा बंदी आणि मंदिचे सावट त्यामुळे कुणाच्याच हातात पैसा नाही. परंतु लग्नकार्य अपरिहार्य असल्याने ते करण्यासाठी दोनतीन दिवसांच्या सोहळ्यात दोन ते पाच लाखाचा चुराडा होतो आहे. मंदिरात होणारे लग्न आता हजारो रूपये भाडे असलेल्या लॉन्समध्ये करण्याची टूम निघाली आहे. साखर पुडा, साक्षीगंध, हळद या चिल्न्लर विधींवरही लाखोंची उधळपट्टी होते आहे. त्यासाठी जमिनी विक्री करणे किंवा गहाण ठेवणे, गृहलक्ष्मीचे स्त्रीधन तारण ठेवणे व कर्ज काढून श्रीमंतीचा आव आणणारा विवाह नाईलाजास्तव वधूवरांना करावा लागत आहे. यामुळे दोन ते तीन दिवसाच्या सोहळयात होणारा लाखोंचा खर्च कुठे तरी आर्थिक प्रगतीसाठी थांबविण्याची गरज असून सर्वानीच नोंदणी पद्धतीच्या किंवा सामूहिक विवाह सोहळ्याला पसंती द्यावी असे ज्येष्ठांचे मत आहे. - काही हजारात पूर्वी होणारा विवाह सोहळा गेल्या काही वर्षात स्वत:च्या नसलेल्या श्रीमंतीचा भपका दाखविण्याच्या नादात काही लाखाच्या घरात पोहोचला आहे. - डी जे. बँड , मंडप, स्टेज, लग्नपत्रिका, लग्नासाठी लागणारी भाड्याची भांडी आईस्क्रीमचे व चिकन मटणाचे भाव वाढले आहेत. तरी त्यावर भरमसाठ खर्च होतो आहे. त्यातच ग्रामीण भागात एकेकाळी लोकप्रिय असलेल्या आणि स्वस्तात मिळणाऱ्या बँजो ऐवजी आता महागड्या डी जेचे फॅड सर्वत्र पसरले आहे.
लग्नाच्या थाटापायी बसतो कर्जाचा विळखा
By admin | Published: February 26, 2017 2:27 AM