बोईसर : उत्पादन प्रक्रियेनंतर निघालेला घातक रासायनिक घनकचरा तारापूर औद्योगिक क्षेत्रातून बाहेर नेण्यात येत असल्याची गोपनीय खबर बोईसर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कारवाई करत त्यांनी प्रथम एक ट्रक पकडला. नंतर अधिक चौकशी करून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांबरोबर संयुक्तरित्या कारवाई करून अन्य पाच असे एकूण सहा ट्रक पकडले आहेत.तारापूरच्या औद्योगिक क्षेत्रातील रामदेव केमिकल या रासायनिक कारखान्यातून बुधवारी रात्री बाहेर नेण्यात येणारा पहिला ट्रक बोईसर पोलीस स्थानकाच्या अंतर्गत येणाºया महागाव बीट येथे पोलिसांनी पकडला. त्यानंतर अन्य ट्रक पकडले असले तरी अजून काही ट्रक बाहेर पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून त्या ट्रकचा शोध बोईसर पोलीस घेत आहेत. हा घनकचरा रीतसर विल्हेवाटीसाठी नेण्यात येत होता की अन्य कुठे नेण्यात येत होता, या संदर्भात कारखाना व्यवस्थापनाकडून माहिती मिळालेली नाही.या घनकचºयाचा नमुना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांनी घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवला आहे. त्याचा अहवाल साधारणपणे १५ दिवसांत येणे अपेक्षित आहे.>जागरुक नागरिकांकडून मिळलेल्या माहितीनंतर संबंधित ट्रक ताब्यात घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांकडे अभिप्राय मागविण्यात आला असून अभिप्राय प्राप्त होताच पुढील कारवाई करण्यात येईल.- प्रदीप कसबे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बोईसर पोलीस स्थानक>अहवाल प्राप्त झाल्यानंतर कायदेशीर कारवाईबाबत योग्य निर्णय घेण्यात येईल- मनिष होळकर, उपप्रादेशिक अधिकारी,महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ,तारापूर एक
घातक रासायनिक घनकचऱ्याचे ट्रक पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 1:17 AM